एसटी प्रवास दिवाळीत होणार महाग
By admin | Published: November 3, 2015 08:00 PM2015-11-03T20:00:37+5:302015-11-03T20:00:37+5:30
ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचा आज निर्णय घेतला, ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत १० टक्के भाडेवाढ होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचा आज निर्णय घेतला, ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत १० टक्के भाडेवाढ होणार आहे. साध्या,रातराणीसाठी १० टक्के, निमआरामी साठी १५ टक्के, वातानुकूलीत बसची २० टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात याणार आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या प्रवाशांचा एसटी प्रवास आता मोठय़ा प्रमाणात महाग होणार आहे.
दिवाळीत प्रवाशांची वाढती गर्दी पाहता एसटीला होणारा तोटा भरुन काढण्यासाठी २० दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ मागे घेण्यात येणार आहे.