सायली ढमढरेच्या मदतीसाठी प्रवासी संघटना सरसावली

By admin | Published: October 25, 2016 07:09 PM2016-10-25T19:09:20+5:302016-10-25T19:09:20+5:30

कल्याण रेल्वे स्थानकात 20 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना गाडीखाली सापडून सायली ढमढरे या तरुणीला दोन्ही पाय गवाविण्याची वेळ आली

Traveling organizations to help the Sally Embassy | सायली ढमढरेच्या मदतीसाठी प्रवासी संघटना सरसावली

सायली ढमढरेच्या मदतीसाठी प्रवासी संघटना सरसावली

Next

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि.25 - कल्याण रेल्वे स्थानकात 20 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना गाडीखाली सापडून सायली ढमढरे या तरुणीला दोन्ही पाय गवाविण्याची वेळ आली. तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सायलीला
रेल्वेतर्फे आर्थिक मदत मिळावी यासाठी कल्याण-कसारा-कजर्त रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आज रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन विविध मुद्दे उपस्थित केली. सायलीचा अपघात हा रेल्वे प्रशसनाच्या चुकीमुळेच झाल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव,श्याम उबाळे, मिलिंद घायवट यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेतली. सायलीला शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली. रेल्वे स्थानकात सात ते नऊ इंच लांबी आणि तीन ते चार इंच रुंदी असण्याची आवश्यकता असताना त्याठिकाणी 10 ते 12 इंचीचा फरक आढळून आला आहे. सायलीचा अपघात झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी हमाल माधव खेमकर यांनी सांगितले की, सायली फलाट व गाडीच्या गॅपमध्ये पडली. तेव्हा काही प्रवाशांनी साखळी खेचली होती. तेव्हा गार्डने गाडी थांबविण्याची सूचना केली असता तर सायलीचे पाय वाचले
असते. तसे झाले नसल्याने सायलीच्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. रेल्वेच्या प्रवासी समितीवरील माजी सदस्य दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. या ठिकाणी मेल एक्सप्रेस गाडय़ा केवळ एक मिनीटे थांबतात. त्यांचा हा थांबा किमान पाच मिनिटांचा करण्यात यावा. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवासी चढणार व उतरणार कसे. तसेच मेल एक्सप्रेस गाडय़ांचे दरवाजे हे अरुंद असतात. त्यामुळे प्रवासी गाडी सूटण्याच्या भितीपोटी एकच गर्दी करतात. त्यामुळे प्रवाशांचा तोल जाऊन ते गाडी व फलाटाच्या गॅपमध्ये पडून मरण पावतात अथवा कायमचे अपंग होतात. याचा विचार रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने करण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाच्या समितीवर कार्यरत असलेले सदस्य किसन तारमळे यांनी आज
ठाणो येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सायलीची भेट घेतली. तिच्या पालकांकडून घटना जाणून घेतली. येत्या 29 ऑक्टोबर रोजी पुण्यात रेल्वे समितीची बैठक आहे. या बैठकीत सायलीला 1क् लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच तिला रेल्वेच्या नोकरीत समावून घेण्यात यावे असे सांगितले जाणार आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी सांगितले की, 2015-16 या वर्षात डोंबिवली परिसरात आत्तार्पयत 72 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. दोन वर्षापूर्वी फलाट व गाडीतील गॅप भरुन काढण्याच्या कामासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा पैसा कुणाच्या घशात गेला. सायली ढमढरे हिला न्याय मिळवून देण्यासाठी रेल्वे
अपघात न्यायप्राधिकरणाकडे दावा दाखल करण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे गाडीतून एकूण 45 लाख प्रवाशी दररोज प्रवास करता. त्यांच्या जिविताचे मोल रेल्वे प्रशासनाला नाही. रेल्वे अपघाता मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना केवळ चार लाख व जखमी झालेल्या प्रवाशाला नुकसान भरपाई पोटी केवळ दोन ते तीन लाख रुपये मिळतात. ही रक्कम अयोग्य आहे. मृतांच्या
कुटुंबियांना किमान 12 लाख व जखमीला किमान सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी अगदी रास्त आहे. रेल्वे प्रवासा दरम्यान मृत्यूमुखी व जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत रेल्वे प्रवाशाकडून न्याय भावनेने पाहिले जात नाही. रेल्वे प्रकरणात प्रवासी जो र्पयत तक्रार करीत नाही. तोर्पयत रेल्वे
प्रशासनाकडून देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जात नाही. प्रवाशी जखमी झाला तर त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्याकडे रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवानांकडून तत्परता दाखविली जात नाही. रेल्वेचे कल्याणला रुग्णालय आहे. एक अद्यावत रुग्णालय या परिसरात रेल्वेने उभारावे ही मागणी संघाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून सुरु आहे. तिचा विचार अद्याप रेल्वे प्रशासनाकडून केला जात नाही.

Web Title: Traveling organizations to help the Sally Embassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.