मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; २१ प्रवाशी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 05:52 PM2023-10-13T17:52:18+5:302023-10-13T17:54:31+5:30
दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ७० पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स तोल गेल्याने पलटी झाली. या घटनेत २१ प्रवासी जखमी असून एका चार वर्षीय मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याहून उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या यूपी ५५ एटी १८९३ क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्सचा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील नरडाणा गावापासून काही अंतरावर तोल गेल्याने अपघात झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रॅव्हल्स मध्ये ७० पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून या घटनेत २१ प्रवासी जखमी झाले. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ७० पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स तोल गेल्याने पलटी झाली. या घटनेत २१ प्रवासी जखमी असून एका चार वर्षीय मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. pic.twitter.com/rMtXfxx8MR
— Lokmat (@lokmat) October 13, 2023
घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नरडाणा पोलीसांसह स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून जखमी झालेल्या प्रवासांना धुळे जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मुंबई आग्रा महामार्गावर अपघात झालेल्या ट्रॅव्हल्समधील प्रवासींना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी टळली असून एका मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी महामार्ग पोलीसांकडून देखील मदतकार्य सुरु आहे. प्रवासींचा सामान मोठ्या ट्रॅव्हल्सच्या वर ठेवण्यात आल्याने ट्रॅव्हल्सने झोल घेत पलटल्याने घटना घडली असल्याचे नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.