दीड दिवसांत शंभर रुग्णांवर उपचार
By admin | Published: May 12, 2017 02:09 AM2017-05-12T02:09:44+5:302017-05-12T02:09:44+5:30
मध्य रेल्वे आणि खासगी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांतील रेल्वे स्थानकाबाहेर सुरू केलेल्या ‘वन रुपी क्लिनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वे आणि खासगी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांतील रेल्वे स्थानकाबाहेर सुरू केलेल्या ‘वन रुपी क्लिनिक’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. रुग्णालय सुरू झाल्यापासून अवघ्या दीड दिवसांत शंभर प्रवासी रुग्णांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे. यात निम्म्याहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदाब, मधुमेह आणि ईसीजी तपासणी केल्याचे आढळून आले.
‘परवडणारी आरोग्य सेवा’ या धर्तीवर बुधवारी मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर ‘वन रुपी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. रेल्वेने मोफत उपलब्ध करून दिलेल्या जागेवर बुधवारी सुरू झालेल्या रुग्णालयात पहिल्या दिवशी ६०-७० रुग्णांनी उपचार घेतले. गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णांचा आकडा शंभरवर पोहोचला. या रुग्णांमध्ये ६० ते ७० टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक आहेत.
सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करतात. परिणामी, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीमध्येच अशा प्रकारची सेवा राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांबाहेर देण्यात येणार आहे. प्रवासी रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास हे रुग्णालय सुरू राहणार आहे.
मधुमेह, रक्तदाब, ईसीजी यांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. शिवाय, आजाराचे निदान केल्यानंतर स्वस्त दरातील मेडिकलमध्ये रुग्णांना औषधे उपलब्ध होत असल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते, अशी भावना
‘वन रुपी क्लिनिक’चे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी व्यक्त केली.