रेती उपशामुळे उन्मळली सुरुची झाडे

By admin | Published: July 18, 2016 03:04 AM2016-07-18T03:04:00+5:302016-07-18T03:04:00+5:30

रायगड जिल्ह्यातील सोन्याचा गणपतीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगरला ४ ते ५ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

Trees grown due to sand rains | रेती उपशामुळे उन्मळली सुरुची झाडे

रेती उपशामुळे उन्मळली सुरुची झाडे

Next


दांडगुरी : रायगड जिल्ह्यातील सोन्याचा गणपतीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगरला ४ ते ५ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. याठिकाणी बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असते. परंतु या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा होत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सुरुची झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार वाढले आहे.
किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी याठिकाणी सुरुची झाडे लावण्यात आली. त्यामुळे किनारी भागातील धूप रोखण्यात काही प्रमाणात यश आले. मात्र आता रेतीमाफियांकडून बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दिवेआगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख बंड्या भाटकर व उप शाखा प्रमुख सुबोध पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर लोकवस्ती आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी लोकवस्तीत शिरायला वेळ लागणार नाही. ग्रामपंचायतीने रेतीमाफियांवर वेळीच कारवाई केली नाही तर जमिनीची धूप होऊन भरतीचे पाणी गावात शिरायला वेळ लागणार नसल्याचे दिवेआगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख बंड्या भाटकर व उप शाखा प्रमुख सुबोध पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. आता उरलेली झाडे वाचविण्यासाठी तरी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
>बेकायदेशीर रेती उपसा
किनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी याठिकाणी सुरुची झाडे लावण्यात आली.
धूप रोखण्यात यश आले तरी आता रेतीमाफियांकडून बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे.
रेतीमाफियांवर कारवाई केली नाही तर जमिनीची धूप होऊन भरतीचे पाणी गावात शिरण्याची भीती आहे.

Web Title: Trees grown due to sand rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.