नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी ‘ट्राय जंक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:36 AM2017-12-18T02:36:39+5:302017-12-18T02:36:48+5:30

नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगढ व मध्य प्रदेश ही तीनही राज्ये एकत्र येऊन ‘ट्राय जंक्शन’ (तिन्ही राज्यांच्या सीमांचा त्रिकोण) ही संयुक्त कारवाई करणार आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन्ही राज्यांना जोडण्यासाठी गोंदिया पोलिसांनी महाराष्ट्र शासनाकडे ३० किमी. रस्त्याच्या निर्मितीचा प्रस्ताव टाकला आहे.

 TRI junction | नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी ‘ट्राय जंक्शन’

नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी ‘ट्राय जंक्शन’

Next

नरेश रहिले 
गोंदिया : नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगढ व मध्य प्रदेश ही तीनही राज्ये एकत्र येऊन ‘ट्राय जंक्शन’ (तिन्ही राज्यांच्या सीमांचा त्रिकोण) ही संयुक्त कारवाई करणार आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन्ही राज्यांना जोडण्यासाठी गोंदिया पोलिसांनी महाराष्ट्र शासनाकडे ३० किमी. रस्त्याच्या निर्मितीचा प्रस्ताव टाकला आहे.
गोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचा रेस्ट झोन म्हणून ओळखला जात असला तरी जिल्ह्यात नक्षली कारवाया होतच असतात. नक्षलवाद्यांचा पाठलाग गोंदिया पोलिसांनी केला तर ते मध्य प्रदेश किंवा छत्तीसगढच्या सीमेत निघून जातात. जिल्ह्याच्या पिपरिया एओपी ते मध्य प्रदेश राज्यातील कट्टीपार हा परिसर ६० ते ७० किलोमीटरचा आहे. पिपरिया ते छत्तीसगढ राज्यातील कटेमा हा परिसर ८० ते ९० किलोमीटरच्या घरात असल्याने या परिसरात असलेल्या घनदाट जंगलाचा फायदा नक्षलवाद्यांना मिळतो. त्यामुळे या जंगल परिसरात असलेल्या पहाडीत कोणत्याही राज्याचे पोलीस पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करू शकत नाहीत.
‘ट्राय जंक्शन’ करण्याचा प्रयत्न असल्यामुळे महाराष्टÑाचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ७ फेबु्रवारी रोजी गोंदिया जिल्ह्याच्या पिपरिया एओपीला भेट दिली.

Web Title:  TRI junction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.