७/११ च्या रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींचा उद्या फैसला
By admin | Published: September 10, 2015 05:03 PM2015-09-10T17:03:07+5:302015-09-10T17:03:07+5:30
मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या (शुक्रवारी) विशेष मोक्का न्यायालय निकाल देणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी उद्या (शुक्रवारी) विशेष मोक्का न्यायालय निकाल देणार आहे. तब्बल ९ वर्षानंतर या बॉम्बस्फोटातील पिडीतांना आता न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
११ जुलै २००६ रोजी पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांमध्ये ११ मिनीटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते. भाईंदर, बोरिवली, जोगेश्वरी, खार रोड, वांद्रे, माहिम आणि माटुंगा रोड अशा स्थानकांजवळ हे स्फोट घडले होते. तर बोरिवलीत एक जीवंत बॉम्ब आढळला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे १८८ जणांचा मृत्यू झाला होता तर ८०० जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने १३ जणांना अटक केली होती. सुमारे २४० साक्षीदारांचा या प्रकरणात जबाब घेण्यात आला आहे. तब्बल नऊ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागणार असून उद्या मोक्का कोर्ट खटल्यावर निकाल देईल अशी शक्यता आहे.