तयाल यांच्याविरुद्ध गुन्हा

By admin | Published: September 10, 2015 03:37 AM2015-09-10T03:37:05+5:302015-09-10T03:37:05+5:30

अ‍ॅक्टिफ कॉर्पोरेशन कंपनीचे अध्यक्ष एस. के. तयाल यांच्याविरोधात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फसवणूक व भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला आहे.

Trial of crime against | तयाल यांच्याविरुद्ध गुन्हा

तयाल यांच्याविरुद्ध गुन्हा

Next

मुंबई : अ‍ॅक्टिफ कॉर्पोरेशन कंपनीचे अध्यक्ष एस. के. तयाल यांच्याविरोधात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फसवणूक व भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँक आॅफ इंडियाने तयाल यांच्याविरोधात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार २००८ मध्ये तयाल यांनी इचलकरंजी येथे सूतगिरणी उभारणार असल्याचे सांगून बँकांकडून मोठ्या रकमांचे कर्ज घेतले होते. मात्र ज्या हेतूसाठी कर्ज घेतले त्याऐवजी तयाल यांनी कर्जाची रक्कम भलतीकडेच वळवली. बँकेच्या तक्रारीनुसार तयाल यांनी २३१.८४ कोटींची फसवणूक केली. यात सीबीआयने अज्ञात व्यक्ती व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्धही गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Trial of crime against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.