व-हाडातील आदिवासी भागात पारंपरिक पिकांसोबत फुलले रेशीम!
By admin | Published: December 15, 2014 03:40 AM2014-12-15T03:40:46+5:302014-12-15T03:40:46+5:30
व-हाडातील आदिवासी भागातील शेतकरी पांरपरिक पिकांसोबतच नवे प्रयोग राबवित असून, आता या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाची कास धरली आहे
अकोला : व-हाडातील आदिवासी भागातील शेतकरी पांरपरिक पिकांसोबतच नवे प्रयोग राबवित असून, आता या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाची कास धरली आहे. प्रादेशिक रेशीम कार्यालयातर्फे या शेतकऱ्यांना या उद्योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे.
‘रेशीम शेती’ अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, वऱ्हाडातील शेतकऱ्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. अमरावती प्रादेशिक रेशीम कार्यालयात अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी पाच शेतकऱ्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.