नशिकमध्ये आदिवासी विकास आयुक्तांना घेराव
By admin | Published: December 12, 2014 02:08 AM2014-12-12T02:08:13+5:302014-12-12T02:08:13+5:30
मागणीसाठी गुरूवारी सकाळी 11 वाजेपासून लोकसंघर्ष मोर्चाच्या आदिवासी महिलांनी आदिवासी विकास आयुक्तांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले.
Next
नाशिक : खान्देशातील आदिवासी बांधवांच्या वनहक्क जमिनींच्या दाव्यांबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी सकाळी 11 वाजेपासून लोकसंघर्ष मोर्चाच्या आदिवासी महिलांनी आदिवासी विकास आयुक्तांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले.
सायंकाळी उशिरार्पयत कोणताही तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच होते. संघटनेने याआधी 11 व 12 जूनला आदिवासी बांधवांच्या प्रश्नावर आदिवासी विकास आयुक्तांना घेराव घातला होता. आंदोलकांनी आदिवासी आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या टेबलावरच जुन्या फायलींचे ढीग ठेवले. लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी प्रतिभा शिंदे, रामदास तडवी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सायंकाळी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प अधिका:यांना चर्चेसाठी बोलविण्यात आले होते.आदिवासी बांधवांच्या वनहक्क जमिनींच्या दाव्यांबाबत तत्काळ अंमलबजावणीची यावेळी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)