आदिवासी गुंतला मशागतीत
By admin | Published: May 30, 2016 01:39 AM2016-05-30T01:39:27+5:302016-05-30T01:39:27+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या भातशेतीच्या कामांचा हंगाम सुरू आहे.
डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या भातशेतीच्या कामांचा हंगाम सुरू आहे. शेतीच्या मशागतीबरोबरच जमीन भाजणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आली असून, आदिवासी शेतकरी सध्या भातशेतीच्या कामांत गुंतला असल्याचे पाहावयास मिळत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. दर वर्षी या भागातील पाटण,आहुपे, तसेच भीमाशंकर खोऱ्यातील सुमारे ४० गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली येत असते. भातपीक हे आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्यपीक असल्याने या पिकाच्या तयारीसाठी राब काढणी, झाडांचा पालापाचोळा जमा करणे, जनावरांचे शेण वाहून रोपात अंथरणे इ.कामे
दरम्यानच्या कालावधीत जमिनीमध्ये अनेक प्रकारचे म्युकर्स व जीवजंतू निर्माण होतात. हे जीवजंतू कोवळ्या भातरोपांना हानीकारक ठरतात. तसेच पेरणीनंतर भातरोपांमध्ये उगवणाऱ्या तणांचाही नाश करावा लागतो. राब, गवत, शेणखत, पालापाचोळा यांच्या साहाय्याने जमीन भाजल्याने खाचरात उत्तम प्रकारचा वाफा तयार होतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या वाफ्यामध्ये भातबियाणे पेरल्याने लागवडीसाठी भाताचे उत्तम रोप तयार होते. वाफे उपटताना सोयीस्कर जात असल्याने भात उत्पादन घेणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे जमीन भाजल्या जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पावसाळा सुरू होताच आदिवासी शेतकरी भातपेरणीच्या कामांना लागणार आहे. यंदाच्या वर्षी पावसाने जर लवकर हजेरी लावली तर आदिवासी शेतक-यांना याचा मोठा फायदा होणार आहे.