आदिवासी, वनविभागात संघर्ष उडण्याची शक्यतो, अस्वल शिकार प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:35 AM2017-10-21T04:35:26+5:302017-10-21T04:35:39+5:30

चिखलदरा तालुक्यातील चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणाला वेगवेगळे वळण देण्याचा प्रकार सुरू असून, शिकारीतून नव्हे तर अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.

 Tribal, possibly feuding in forest department, bears hunting episodes | आदिवासी, वनविभागात संघर्ष उडण्याची शक्यतो, अस्वल शिकार प्रकरण

आदिवासी, वनविभागात संघर्ष उडण्याची शक्यतो, अस्वल शिकार प्रकरण

Next

परतवाडा (अमरावती) : चिखलदरा तालुक्यातील चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणाला वेगवेगळे वळण देण्याचा प्रकार सुरू असून, शिकारीतून नव्हे तर अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.
यातून आदिवासी व वनविभागात संघर्ष उडण्याची भीती वर्तविली जात आहे. शुक्रवारी दिवसभर चार जीपमध्ये काही आदिवासींनी दिवसभर परतवाड्यात येऊन अटकेतील आरोपीला सोडण्याची मागणी केली.
पूर्व मेळघाट वनविभागातील अंजनगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया टेब्रुसोंडा वर्तुळातील चौºयामल येथे १७ आॅक्टोबर रोजी एक नर जातीचे अस्वल मृतावस्थेत वनाधिका-यांना आढळून आले होते.
दहा वर्षे वयाच्या या अस्वलाच्या एका पंजाला जखम आहे, तर तीन पंजे बेपत्ता आढळले होते. वनाधिका-यांनी सदर घटनेचा पंचनामा करून गोपाल बेलसरे (२५, रा. चौ-यामल) याला अटक केली होती, तर तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिले.
अस्वलाला भाला, काठ्या व दगडाने ठार केल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाल्याने वनविभागाने चौकशीची गती वाढविली होती.

आदिवासी आक्रमक, वनकर्मचाºयांवर हल्ल्याची शक्यता

अस्वलाची शिकार झाली नसून, ते गावशिवारावर मृतावस्थेत आढळून आल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. वनाधिकारी अटक करीत असल्याने चौºयामल गावातील आदिवासी आक्रमक झाले. थेट वनकर्मचा-यांवर हल्ला करण्याचा बेत त्यांनी आखल्याची गोपनीय माहिती वनाधिकाºयांना प्राप्त झाली तसेच तीन ते चार जीपमध्ये आदिवासी परतवाड्यात गुरुवारी दुपारी दाखल झाले होते. वनाधिकाºयांनी संरक्षणासाठी पोलिसांची मदत घेतल्याचे सांगण्यात आले.
एकाने केले चित्रीकरण
अस्वल शिकार प्रकरणाचे चित्रीकरण एका आदिवासी युवकाने आपल्या मोबाईलमध्ये केल्याची माहिती मिळताच वनाधिकाºयांनी याबाबत चौकशी सुरू केली. गावकºयांना सदर प्रकार माहीत होताच पूर्ण डेटा डीलिट करण्यात आला. आता तो रिकव्हर करण्याचे प्रयत्न वनाधिकारी करणार आहेत. त्यामध्ये अस्वलाची शिकार की नैसर्गिक मृत्यू, यांसह सर्व बाबी स्पष्ट होणार आहे. आदिवासींमध्ये वनविभागाबद्दल संताप व्यक्त असताना, अस्वलाचे तीन पंजे चौथ्या दिवशी सापडले नाहीत. ते कुणी नेले, याचा तपास सुरू आहे.

Web Title:  Tribal, possibly feuding in forest department, bears hunting episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.