आदिवासी विद्यार्थ्यांच्या हाती टॅब!

By admin | Published: April 30, 2017 01:15 AM2017-04-30T01:15:56+5:302017-04-30T01:15:56+5:30

महाराष्ट्र दिनी येथील ७७ प्राथमिक शाळांतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात टॅब येणार आहे. साडेसात लाख रुपये गोळा झाले असून त्यातून १५० टॅब खरेदी करण्यात

Tribal students tab tab! | आदिवासी विद्यार्थ्यांच्या हाती टॅब!

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हाती टॅब!

Next

- हेमंत आवारी, अकोले (अहमदनगर)

महाराष्ट्र दिनी येथील ७७ प्राथमिक शाळांतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात टॅब येणार आहे. साडेसात लाख रुपये गोळा झाले असून त्यातून १५० टॅब खरेदी करण्यात आले आहे. लोकवर्गणीतून ‘टॅब’ खरेदी करण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
आदिवासी भागातील शाळांमधील मुलांच्या हाती
टॅब दिल्यास त्यांना ज्ञानग्रहण
करणे आणखी सोपे होईल, असा विचार शिक्षकांमधून पुढे आला. नवीन शैक्षिणक ‘अ‍ॅप्स्’च्या माध्यमातून ज्ञानदान सुसह्य करण्याच्या हेतूने ७७ शिक्षकांनी त्यात सहभाग घेतला.

गटशिक्षणाधिकारी परशुराम पावसे व स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्गदर्शनाने टॅब खरेदीची संकल्पना पुढे आली. त्याला ७७ शाळांतील शिक्षकांनी प्रतिसाद दिला. शिक्षकांनी खिशाला झळ सोसून व लोकवर्गणीतून १५० टॅब खरेदी केले आहेत. कोणत्याही शाळेला टॅब खरेदीसाठी सक्ती केलेली नाही.
- जालिंदर खताळ, शिक्षण विस्ताराधिकारी, अकोले

Web Title: Tribal students tab tab!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.