रुग्णालयाच्या आवारात आदिवासी महिलेची प्रसूती

By Admin | Published: March 8, 2015 02:18 AM2015-03-08T02:18:53+5:302015-03-08T02:18:53+5:30

अद्यापही अबला महिलांची अहवेलना सुरू असल्याचे विदारक उदाहरण विरार ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळाले आहे.

The tribal woman's delivery in the premises of the hospital | रुग्णालयाच्या आवारात आदिवासी महिलेची प्रसूती

रुग्णालयाच्या आवारात आदिवासी महिलेची प्रसूती

googlenewsNext

विक्रमगड : महिला दिनानिमित्त एकीकडे त्यांचे हक्क व अधिकारांबाबतची चर्चा जगभरात सुरू असताना अद्यापही अबला महिलांची अहवेलना सुरू असल्याचे विदारक उदाहरण विरार ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळाले आहे. वीटभट्टीवर काम करणाऱ्या आदिवासी महिला प्रस्ूुतीसाठी रुग्णालयात आली असताना तिच्याकडे रिपोर्ट फाइल नसल्याचे कारण सांगत दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तिची प्रसूती रुग्णालयाच्या आवारातच खाजगी वाहनात झाली. विशेष म्हणजे एका महिला डॉक्टरने तिचा प्रवेश नाकारला असून, तिच्याविरुद्ध महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील वरिष्ठाकडे तक्रार केली आहे.
डोल्हारी (बु.) येथील धाणीव, ता. विरार येथील वीटभट्टीवर काम करणारी दर्शना परशुराम उंबरसाडा ही महिला पोटात दुखू लागल्याने पतीसह शनिवारी सकाळी सात वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात आली. मात्र ड्युटीवरील डॉ. तेजस्वी घोसाळ यांनी महिलेची रिपोर्ट फाइल दाखवा, असे नातलगांना सांगितले. आता आमच्याकडे काही कागदपत्र नाहीत असे त्यांनी सांगितले असता, जोपर्यंत रिपोर्ट दाखवत नाही तोपर्यंत आम्ही रुग्णाला दाखल करून घेणार नसल्याचे सांगितले. त्या तपासण्यास पुढे आल्या नाहीत. विनंती करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. अशाच अवस्थेत अर्धा तास गेला़ अखेर महिलेला वेदना असह्य होऊन रुग्णालयाच्या आवारातच खाजगी वाहनात प्रसूती झाली. सुदैवाने नवजात बाळ व दर्शनाही सुखरूप राहिल्या.

च् दर्शना सकाळी ७ वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्याकरिता आली.
च्मात्र ड्युटीवरील डॉ. घोसाळे यांनी रिपोर्टची फाइल नसल्याने तिला तपासण्याची तसदीही न घेता अ‍ॅडमिट करून घेतले नाही.

Web Title: The tribal woman's delivery in the premises of the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.