अन्यायाविरोधात लढणारे आदिवासी हे नक्षलवादी नाहीत, शरद पवार यांचे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 06:42 PM2021-11-14T18:42:01+5:302021-11-14T18:43:20+5:30

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज नाशिक येथे एक मोठे विधान केले आहे. अन्यायाविरोधात लढणारे आदिवासी हे नक्षलवादी (Naxalites) असून शकत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Tribals fighting against injustice are not Naxalites, says Sharad Pawar | अन्यायाविरोधात लढणारे आदिवासी हे नक्षलवादी नाहीत, शरद पवार यांचे विधान 

अन्यायाविरोधात लढणारे आदिवासी हे नक्षलवादी नाहीत, शरद पवार यांचे विधान 

googlenewsNext

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज नाशिक येथे एक मोठे विधान केले आहे. अन्यायाविरोधात लढणारे आदिवासी हे नक्षलवादी असून शकत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच शिवरायांचे राज्य हे भोसल्यांचे नाही, तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, पिढ्यान पिढ्या देशाचे मूळ मालक असलेल्यांची अवस्था आज वाईट झाली आहे. आदिवासींच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची गरज आहे. आदिवासींसाठी संघर्ष करावा लागेल. मात्र अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी हा नक्षलवादी असू शकत नाही. पुढील आठवड्यात मी स्वत:  नक्षलग्रस्त भागात जाणार आहे. तेथील तरुणांशी मी संवाद साधणार आहे, असे शरद पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याचा उल्लेख कुणी भोसल्यांचे राज्य असा केला नाही, ते रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले गेले. भीमा-कोरेगावमध्ये ऐतिहासिक घटना घडली. पण त्यावरून देशात वाद झाला. तिथे लढणाऱ्या व्यक्ती ह्या आदिवासी होत्या. बिरसा भगवान मुंडा यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, असेही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, नरहरी झिरवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.  

Web Title: Tribals fighting against injustice are not Naxalites, says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.