जिल्ह्यात आदिवासींचे ‘रवाळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2016 03:11 AM2016-08-02T03:11:56+5:302016-08-02T03:11:56+5:30
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण पालघर जिल्ह्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली असली तरी विभाजनाच्या दोन वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न समस्या आणि दुरवस्था जैसे थे
पालघर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण पालघर जिल्ह्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली असली तरी विभाजनाच्या दोन वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न समस्या आणि दुरवस्था जैसे थे असल्याने आता आदिवासींचे देव तरी सरकारला सुबुद्धी देऊन हे प्रश्न समस्या सोडवतील अशी उपहासात्मक भूमिका घेऊन संघटनेन जिल्ह्यतील पालघर, जव्हार, वाडा, विक्र मगड, मोखाडा आण िवसईच्या तहसील कार्यालांसमोर आदिवासींच्या पारंपरिक ‘रवाळ’ कार्यक्र म करून देवांचे जागरण घातले.
जव्हार, मोखाडा, विक्र मगड ,डहाणू , तलासरी या भागातील आदिवासी अत्यंत हलाखीचे आणि वंचित जीवन जगतोय आणि त्याला जर विकासाचा प्रवाहात आणायचे असेल तर या आदिवासी बहुल भागाला एका स्वतंत्र अशा आदिवासी जिल्ह्याचा दर्जा द्यावा लागेल अशी मागणी गेली अनेक वर्षे होती. दोन वर्षापूर्वी जिल्हा निर्माण केला मात्र आजही हे विभाजन फक्त नावापुरताच आहे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले कुपोषण, बेरोजगारी ,स्थलांतर यासारखे गंभीर प्रश्न आजही प्रलंबित असल्याचा आरोप करत श्रमजीवीने पालघर मध्ये संताप व्यक्त केला. येथील आदिवासींचे जीवन आज आगीतून फुफाट्यात गेल्यासारखे झाले असल्याची खंत यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याचे विभाजन केले मात्र आजही येथे ३७ वेग वेगळ्या प्रकारची शासकीय विभागाची कार्यालय निर्माण झालेली नाहीत. अतिमहत्वाच्या असलेल्या आरोग्य विभागासह अनेक विभागाची पदं रिक्त आहेत. या आंदोलनात श्रमजीवीचे केशव नानकर, रामभाऊ वारणा , सुरेश रेन्जड या वरिष्ठ पदाधिकार्यांनी स्वत: आदिवासींचा पारंपारिक पोशाख करून रवाळ करताना सहभाग घेतला. विजय जाधव,उल्हास भानुशाली, सरिता जाधव, प्रवीण पाटील, राजेश राउत, कैलास तुम्बडा,पांडू मालक यासंह सुमारे ७ ते ८ हजार कार्यकर्ते सभासदांनी जिल्हाभरात आंदोलन केले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न समस्यांना आकडेवारीसह तपशील असलेले निवेदन प्रत्येक तहसिलदारामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली. शक्य तेथे सहकार्य आणि आवश्यक तेथेच संघर्ष या भूमिकेत काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने रोजगार हमी, कुपोषणासारख्या प्रश्नावर प्रशासनाच्या सोबतीला प्रत्यक्ष कामही केले. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी स्पेशल टीम तयार करून प्रश्नाला प्रभावी काम करण्यात मदत केली.