हवेत बंदुकीच्या फैरी झाडून भूकंपातील मृतांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 06:29 PM2018-09-30T18:29:13+5:302018-09-30T18:29:41+5:30
किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना रविवारी सकाळी ८ वाजता श्रध्दांजली वाहण्यात आली. जुन्या किल्लारी गावातील स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन हवेत ८ बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार केसकर, सपोनि कामत, पीएसआय गणेश कदम, सरपंच शैला दिलीप लोव्हार, उपसरपंच अशोक पोतदार, माजी जि.प. सदस्य दिलीप लोव्हार, प्रकाश पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरद भोसले, वनविभागाचे अधिकारी पोतुलवार, बी. पी. मुदाळे, शेवाळे, बिसरसिंग ठाकूर, गुलाब शिंदे, वल्ली पठाण, रुक्मोद्दीन शेख, प्रा. संजय मोरे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी त्या काळ्या दिवसाच्या आठवणी सर्वांसमोर जाग्या झाल्या. त्यानंतर सर्वांनी ग्रामदैवत नीळकंठेश्वराचे दर्शन घेऊन घराकडे परतले. दरम्यान, गावातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन श्रध्दांजली वाहिली.