देहूरोडला शहीद जवानांना श्रद्धांजली

By admin | Published: September 22, 2016 02:22 AM2016-09-22T02:22:54+5:302016-09-22T02:22:54+5:30

जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावरील दहशतवाद्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा देहूरोड परिसरातील विविध भागांत निषेध करण्यात आला.

Tribute to martyrs of Dehurod | देहूरोडला शहीद जवानांना श्रद्धांजली

देहूरोडला शहीद जवानांना श्रद्धांजली

Next


देहूरोड : जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावरील दहशतवाद्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा देहूरोड परिसरातील विविध भागांत निषेध करण्यात आला. यासह ‘पाकला द्या झोळी , दहशतवाद्यांना गोळी’ अशा पाकिस्तानविरोधात घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच मेणबत्ती प्रज्वलित करून शोकयात्रेनंतर शहीद भारतीय वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
देहूरोडमधील जनतेच्या वतीने अबुशेठ रोड येथील रिक्षा स्टँडजवळ झालेल्या सभेत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाचे धर्मपाल तंतरपाळे , भीमशक्ती संघटनेचे महेश गायकवाड, नरसीन शेख, वैशाली अवघडे, अन्वर तांबोळी, विजय मोरे, अजय बखारिया,अजय कोटफोडे, दीपक सायसर, अरुण अवघडे, अशरफ अत्तार, मनोद्दीन शेख, दीनानाथ चौरोसिया , जगदीश कनोतिया, आनंद साळवे, व्यंकटेश कोळी आदी उपस्थित होते.
महर्षी वाल्मीकी चौकात ( वृंदावन ) पाकिस्तानविरोधात निषेध घोषणा देत, पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे, सरकारने भारतीय जवानांना दहशतवाद्यांना गोळ्या घालण्याचे आदेश कायमस्वरूपी द्यावेत. शहिदोंका बलिदान ना होगा व्यर्थ , खून बहाकर पाकिस्तान करना होगा खत्म, आदी घोषणा देत पाकिस्तानचे नवाज शरीफ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले.
अबुशेठ रोड व्यापारी संघटनेचे सूर्यकांत सुर्वे, अनिल खंडेलवाल, संदीप गुप्ता, सागर गुप्ता, जलाल शेख, शिवसेनेचे रमेश जाधव, काँग्रेसचे लक्ष्मण ढिल्लोड, आरटीआय कार्यकर्ता पोपट कुरणे, आकाश डुलगज, रोहन गायकवाड, नारायण रेड्डी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्क्षा संघटनेचे सर्व सभासद, अबुशेठ रोड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी या वेळी उपस्थित होते.
साईनगर येथे मेणबत्ती प्रज्वलित करून साई चौक ते वीरबाबा चौक शोकयात्रा काढण्यात आली. शोकयात्रेत महिलांची संख्या अधिक होती. शोकयात्रेनंतर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी गहुंजे ग्रामपंचायत सदस्या वंदना तरस, वनमाला नाईकनवरे, प्रमिला कदम, रजनी सिंग, खाजाबी शेख, स्नेहल जाधव, दामिणी फाळके आदी महिलांसह वीरबाबा मित्र मंडळ, वाघजाई मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tribute to martyrs of Dehurod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.