कोपर्डीतील पीडितेला श्रद्धांजली
By admin | Published: July 14, 2017 05:44 AM2017-07-14T05:44:56+5:302017-07-14T05:44:56+5:30
कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईकर गुरुवारी सायंकाळी सीएसटी येथील अमर जवान ज्योतीजवळ एकवटले होते.
Next
मुंबई- कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईकर गुरुवारी सायंकाळी सीएसटी येथील अमर जवान ज्योतीजवळ एकवटले होते. महिलांनी मेणबत्ती पेटवून पीडितेला श्रद्धांजली वाहिली. ही दुर्दैवी घटना होऊन एक वर्ष उलटल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याने सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सरकारवर टीका केली.
पवार म्हणाले की, खटला जलदगती न्यायालयात असून, एक वर्ष उलटल्यानंतरही बचाव पक्षाचे वकील वेळकाढूपणा करत आहेत. त्यामुळे सरकारने जलदगती न्यायालयातील खटल्यांना मुदत घालून देण्याची गरज आहे.
९ आॅगस्टच्या मुंबईतील महामोर्चात या प्रकरणाचा जाब विचारला जाईल, असेही त्यांनी सांगितले.