रेल्वेच्या २४२ ‘लोको’वर झळकणार तिरंगा
By admin | Published: August 13, 2016 09:30 PM2016-08-13T21:30:25+5:302016-08-13T21:30:25+5:30
स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व झोनमधील विभागांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ‘लोको’ (रेल्वे इंजिन) वर तिरंगा झेंडा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत
Next
>- ऑनलाइन लोकमत
रेल्वे बोर्डाचे निर्देश : नागपूर विभागात अंमलबजावणी सुरू
नागपूर, दि. 13 - स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व झोनमधील विभागांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ‘लोको’ (रेल्वे इंजिन) वर तिरंगा झेंडा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान मध्य रेल्वेचा नागपूर विभाग आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एकूण २४२ ‘लोको’वर तिरंगा झेंडा काढण्यात येणार आहे.
भारतात रेल्वे हे प्रवासाचे सुलभ, स्वस्त माध्यम असल्यामुळे देशात लाखो नागरिक रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. स्वातंत्र्य दिन दोन दिवसांवर आलेला असताना त्यानिमित्त रेल्वे बोर्डाने आदेश काढून रेल्वेच्या सर्व झोनमध्ये येणाºया विभागांना रेल्वेच्या इंजिनावर भारताचा तिरंगी ध्वज काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वे इंजिनच्या समोरील दर्शनी भागात हा तिरंगा झेंडा राहणार असून यामुळे प्रवाशांमध्ये देशप्रेमाची भावना जोपासण्याचा संदेश देण्याचा रेल्वेचा मानस आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये एकूण २१७ इलेक्ट्रिक लोको आहेत. या लोकोवर तिरंगा काढण्यास सुरुवात झाली असून रेल्वे बोर्डाच्या आदेशानंतर यातील १५ लोकोवर तिरंगा काढण्यात आला आहे. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ११ नॅरोगेज डिझेल लोको आणि १४ ब्रॉडगेज डिझेल लोको आहेत. या लोकोवरही तिरंगा झेंडा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे लवकरच नागपूर विभागातून ये-जा करणाºया सर्व रेल्वेच्या इंजिनवर भविष्यात तिरंगा झळकताना प्रवाशांना पाहावयास मिळणार आहे