त्र्यंबक पर्वणी कुशावर्तातच

By admin | Published: September 23, 2015 01:07 AM2015-09-23T01:07:07+5:302015-09-23T01:07:07+5:30

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचून न्यायालयाने पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

Trimambak mountain cushruta | त्र्यंबक पर्वणी कुशावर्तातच

त्र्यंबक पर्वणी कुशावर्तातच

Next

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचून न्यायालयाने पाणी काटकसरीने वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे २५ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वरमधील अंतिम पर्वणीसाठी भाविकांना थेट कुशावर्तात स्नानाची संधी प्रशासनाकडून दिली जाणार आहे.
अहिल्या धरणावर बांधलेल्या तिन्ही घाटांंवर स्नानासाठी पाणी सोडण्यास त्र्यंबक नगरपालिका अनुत्सुक असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दोन्ही पर्वणीच्या काळात कुशावर्तात स्नानासाठी होणारी भाविकांची गर्दी पाहून अहिल्या धरणाचे काही दरवाजे उघडून प्रशासनाने घाटांवर स्नानासाठी पाणी खेळते ठेवले होते, परंतु भाविकांनी घाटांकडे पाठ फिरवित कुशवर्तातच स्नानासाठी गर्दी केली होती.
दोन्ही पर्वणींचा अनुभव पाहता तिसऱ्या पर्वणीला मुळातच भाविक कमी येतील, अशी आशा प्रशासनाला असून त्याचाच आधार घेऊन अहिल्या धरणातून तिसऱ्या पर्वणीला पाणी न सोडण्याचे नगरपालिकेच्या विचाराधीन आहे.
गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास निर्बंध घालण्याच्या मागणीवर पाटबंधारे खात्याला विचारणा केली. नाशिकच्या तिन्ही पर्वण्या आटोपल्यामुळे आता गंगापूर धरणातून कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Web Title: Trimambak mountain cushruta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.