सव्वादोनशे वर्षांनंतर त्रियोग

By admin | Published: July 6, 2015 02:26 AM2015-07-06T02:26:17+5:302015-07-06T02:26:17+5:30

आषाढ आणि त्यात अधिकमास असे सगळे योग जुळून येत असताना १८ वर्षांनंतर येणारे कोकिळाव्रत यंदा सिंहस्थ काळात आल्याने धार्मिक कार्यांची रेलचेल जाणवणार आहे.

Trio of Savvonson Years | सव्वादोनशे वर्षांनंतर त्रियोग

सव्वादोनशे वर्षांनंतर त्रियोग

Next

संकेत शुक्ला, नाशिक
आषाढ आणि त्यात अधिकमास असे सगळे योग जुळून येत असताना १८ वर्षांनंतर येणारे कोकिळाव्रत यंदा सिंहस्थ काळात आल्याने धार्मिक कार्यांची रेलचेल जाणवणार आहे. चतुर्मास, अधिकमास आणि त्यातच कोकिळाव्रतही आले आहे. तब्बल सव्वादोनशे वर्षांनंतर यंदा हा योग जुळून आला आहे.
कोकिळाव्रत वेगवेगळ्या महिन्यात येत असते. त्यातच आषाढ महिन्यात आल्यास त्याचे वेगळे महत्त्व सांगितले जाते. दर १८ वर्षांनी आषाढात कोकिळाव्रत येते. यंदाही ते अधिकमासाला लागून आषाढातच आले आहे. एवढेच त्याचे महत्त्व नसून सिंहस्थपर्वात आलेले कोकिळापर्व म्हणून त्याकडे बघितले जाते आहे. शके १७१२ म्हणजेच इसवी सन १७९०नंतर तब्बल २२५ वर्षांनंतर सिंहस्थात कोकिळाव्रत आले आहे. त्यामुळे यंदा ‘अधिकस्य अधिक फलम्’ प्रत्यक्षात उतरले आहे.
दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास हा चांद्र आणि सूर्य कालगणनेमधील अंतर भरून काढण्यासाठी अधिकमास गणला जातो. चंद्रगणनेनुसार ३५६ दिवसांचे वर्ष तर सूर्यगणनेनुसार ३६५ दिवसांचे एक वर्ष असते. भारतीय पंचांग चांद्र वर्षानुसार कार्यरत असते; आणि कालगणना ही सूर्यगणनेनुसार होते. या दोघांमध्ये तीन वर्षांत एक महिन्याचे अंतर पडते. ते भरून काढण्यासाठी अधिकमास गणला जातो. त्याला पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखले जाते. त्यात धार्मिक कार्य केले जाते.
गेल्या ११५ वर्षांत चार वेळा सिंहस्थात अधिकमास आला आहे. त्यात १९०९, १९४५, १९८०, २००४ आणि यंदाच्या २०१५चा समावेश आहे.

पुराणकथांमध्ये उल्लेख
च्पार्वतीचे वडील दक्ष प्रजापती यांनी आयोजिलेल्या यज्ञात पार्वती-शंकराला आमंत्रण नव्हते. मात्र त्यानंतरही यज्ञात पोहोचलेल्या शंकर - पार्वतीचा दक्ष राजाने अपमान केल्यानंतर क्रोधाग्नीत पार्वतीने यज्ञात देह झोकून दिला. त्यानंतर झालेला विध्वंस कमी झाल्यानंतर शंकराने पार्वतीलाही शाप दिला की,
तू देहाचा त्याग केला, हे पाप आहे. त्यामुळे तू कोकिळा होशील.

च्दाक्षायणी रूपात प्रगट झाल्यानंतर पार्वतीने उ:शाप मागितला. त्यावर शंकराने कोकिळाव्रत आणि कोकिळेचे महत्त्व सांगितले आणि तू काळ्या रंगाचा पक्षी झालीस तरी नंदनवनात वावरशील आणि लोकांना आल्हाददायक आनंद देशील असा उ:शाप दिला, असा उल्लेख पुराणकथांमध्ये आढळतो.

Web Title: Trio of Savvonson Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.