मराठा मोर्चातून परतताना तिहेरी अपघात; 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 09:35 AM2017-08-10T09:35:48+5:302017-08-10T14:00:25+5:30
येवला -औरंगाबाद रोडवर तिहेरी अपघात झाल्याची माहिती मिळते आहे
औरंगाबाद, दि. 10- औरंगाबाद रोडवर तिहेरी अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या पाचपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून यामधील दोघांवर औरंगाबाद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर एका जखमीवर येवल्यामधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर दोन जखमींवर वैजापूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. हर्षल अनिल घोलप (वय, २८, रा. गावठाण, रुकडी पुणे), नारायण कृष्णा थोरात (वय, २१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे अशी मृतांची नावं आहेत. तर गौरव प्रजापती(२२) आणि ओमेश भगत (२०) अशी जखमींची नवे आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
नांदगांव फाट्याजवळ ट्रक आणि दोन कारची धडक झाली असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चातून घरी परतत असताना हा अपघात झाल्याचं समजलं आहे. गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. वैजापुर तालुक्यातील नांदगांव फाट्याजवळ हा अपघात घडला.. मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये एका बारा वर्षाच्या मुलाचाही समावेश असल्याचं समजतं आहे.
मुंबईतही बुधवारी घडली दुर्घटना
वडाळ्यातील भक्ती पार्क येथील मोनो रेल बस स्टॉपजवळ बाईक पार्क करून रस्त्याच्या दुभाजकावर बसलेल्या तीन जणांना भरधाव ट्रकनं उडवलं. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीररीत्या जखमी आहे. 23 वर्षीय विनायक भास्कर ढगे, 25 वर्षीय सिद्धेश मासे यांचा मृत्यू झाला आहे. तर 22 वर्षीय सिद्धेश सुरेश चव्हाण गंभीररीत्या जखमी आहे. ट्रक चालकाविरोधात वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, 45 वर्षीय ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबईतील वडाला भागातील भक्ती पार्क सर्कलजवळ ट्रकने तीन बाईकना धडक दिली. बुधवारी (9 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारस ही घटना घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. सायन हॉस्पिटलमध्ये जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.