गुप्तधनाच्या लालसेतून तिहेरी हत्याकांड

By Admin | Published: June 6, 2016 03:30 AM2016-06-06T03:30:39+5:302016-06-06T03:30:39+5:30

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे झालेल्या तिहेरी खून प्रकरणाचा चार महिन्यानंतर पोलिसांना उलगडा झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या चौकशीत गुप्तधनाच्या

Triple massacre in the wake of espionage | गुप्तधनाच्या लालसेतून तिहेरी हत्याकांड

गुप्तधनाच्या लालसेतून तिहेरी हत्याकांड

googlenewsNext

परभणी : मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे झालेल्या तिहेरी खून प्रकरणाचा चार महिन्यानंतर पोलिसांना उलगडा झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या चौकशीत गुप्तधनाच्या लालसेतून हे हत्याकांड झाल्याचे उघड झाले आहे.
परभणी-पाथरी रस्त्यावरील ताडबोरगाव शिवारातील आखाड्यावर २ फेब्रुवारीच्या रात्री दरोडेखोरांनी सुभाष पठाडे, त्यांच्या पत्नी शांताबाई आणि सूर्यभान फुलपगारे यांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला होता. ३१ मे रोजी पहाटे याच परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल चोरी करताना पोलिसांनी बालाजी राजेंद्र शिंदे व बबलू अंकुश काळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी सहा आरोपी फरार झाले. चौकशीदरम्यान एकाने ताडबोरगाव खून प्रकरणाचा उल्लेख केल्याने पोलिसांचा संशय बळावला.
या दोघांकडे सखोल चौकशी केली असता अन्य आरोपींची नावेही पोलिसांनी मिळाली. या तिहेरी खून प्रकरणात गणेश किशन काळे व अशोक अर्जून पवार यांना शनिवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात एकूण सात आरोपी असून, त्यापैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आम्ही आणखी ४ आरोपींच्या मागावर असून, लवकरच ते हाती येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Triple massacre in the wake of espionage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.