तिस-या मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसची ट्रायल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:49 AM2017-10-03T03:49:05+5:302017-10-03T03:49:24+5:30
देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाचे अंतर अधिक जलदगतीने पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या नव्या गाडीची सोमवारी ‘ट्रायल रन’ घेण्यात आली.
मुंबई : देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाचे अंतर अधिक जलदगतीने पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या नव्या गाडीची सोमवारी ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. ही गाडी वांद्रे टर्मिनस येथून दुपारी ४ वाजता निघाली आणि ती आता हजरत निजामुद्दीन स्थानकावर पहाटे ५.४५ मिनिटांनी पोहचणे अपेक्षित आहे.
मुंबई-दिल्ली अंतर १४ तासांपेक्षा कमी वेळात पार करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. चाचणीदरम्यान ही एक्स्प्रेस १३० किमी प्रतितास या वेगाने धावण्याची अपेक्षा आहे.
रिसर्च डिझाईन अॅन्ड स्टॅन्डर्ड आॅर्गनायझेशनने तयार केलेल्या एलएफबी बोगीसह ती वांद्रे येथून रवाना झोली आहे.
सध्या मुंबई-दिल्ली मार्गावर दोन राजधानी एक्स्प्रेस धावत आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकावरून सायंकाळी ५ वाजता सुटणारी राजधानी एक्स्प्रेस दिल्ली (हजरत निजामुद्दीन स्थानकावर) दुपारी ३.४० वाजता पोहोचते.
तर आॅगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी रवाना होऊन दुपारी ४ वाजून ५ मिनिटांत मुंबई-दिल्ली हे अंतर पूर्ण करते.