तिघाडीत पेच! एकनाथ शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढविणार; खासदारांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:05 AM2023-10-17T10:05:14+5:302023-10-17T10:05:32+5:30

भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटात जागावाटप कसे होणार याचा पेच निर्माण झाला आहे.

Triple party! Eknath Shinde Shivsena group to contest 22 Lok Sabha seats; Decisions in the meeting of MPs | तिघाडीत पेच! एकनाथ शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढविणार; खासदारांच्या बैठकीत निर्णय

तिघाडीत पेच! एकनाथ शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढविणार; खासदारांच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या सर्वच्या सर्व २२ जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी सोमवारी पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत जिंकलेल्या १८ तर पराभूत झालेल्या ४ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटात जागावाटप कसे होणार याचा पेच निर्माण झाला आहे.

 या बैठकीला शिंदे गटात असलेले सर्व १३ खासदार उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. मंत्र्यांवर प्रत्येकी दोन ते तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल, असेही ठरले. 

जागा बदलण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर 
२२ जागा लढवणार आहोतच. मात्र यातील एखादी जागा बदलायची झाल्यास त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्कप्रमुखही नेमले जातील. वेगवेगळ्या समन्वय समित्याही नेमण्यात येणार असल्याचे शेवाळे म्हणाले.

Web Title: Triple party! Eknath Shinde Shivsena group to contest 22 Lok Sabha seats; Decisions in the meeting of MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.