“जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतात”; भाजपाच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 05:56 PM2021-11-13T17:56:50+5:302021-11-13T17:58:01+5:30

Tripura Violence: अमरावती मध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलीस कुठे होते? असा सवाल भाजपा नेत्यांनी केला आहे.

Tripura: When Sharad Pawar's government comes to power in the state riots happen Says BJP Anil Bonde | “जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतात”; भाजपाच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप

“जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतात”; भाजपाच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप

googlenewsNext

अमरावती – त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना पाहायला मिळत आहे. राज्यातील अमरावती, नांदेड, मालेगाव इथं हिंसक घटना घडत आहेत. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप लावला आहे. जेव्हा जेव्हा राज्यात शरद पवारांचे सरकार येते तेव्हा दंगली घडतात असा थेट आरोप बोंडे यांनी लावला आहे.

अनिल बोंडे(Anil Bonde) म्हणाले की, अमरावती, नांदेड मध्ये ज्या दंगली होत आहे त्या शरद पवार यांच्या आशीर्वादाने होत आहे. जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात. अमरावती मध्ये जो हिंसाचार झाला तेव्हा पोलीस कुठे होते? आज सर्व हिंदू रस्त्यावर उतरले तर पोलीस प्रशासन सरकार व नेत्यांच्या दबावाखाली आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी सुद्धा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. आज अमरावतीमध्ये भाजपाने बंदची हाक दिली होती.

तसेच आज पोलिसांनी आंदोलक हिंदूंना अडवले त्यांच्यावर लाठीमार, पाणी फेकले, अश्रू वार केले परंतु हे मुस्लिम आज सुद्धा खुलेआम देशी कट्टे आणि तलवारी घेऊन फिरत आहेत परंतु कारवाई फक्त हिंदुवरच का? पोलीस प्रशासन ह्याच्यावर का कारवाई करीत नाही, त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे हे आधी स्पष्ट करावे अशी मागणीही भाजपा नेते अनिल बोंडे यांनी केली आहे.

भाजपाच्या षडयंत्राला बळी पडू नये – काँग्रेस

महागाई, शेतकरी आंदोलन अशा मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजपा व मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये, राज्यात शांतता राखावी, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

Web Title: Tripura: When Sharad Pawar's government comes to power in the state riots happen Says BJP Anil Bonde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.