उभ्या रिंगणाच्या अपूर्वाची वारकऱ्यांनी अनुभवली तृप्ती
By Admin | Published: June 26, 2017 01:56 AM2017-06-26T01:56:07+5:302017-06-26T01:56:07+5:30
‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ असा गजर करीत निघालेल्या ज्ञानोबारायांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण रविवारी पार पडले.
गोपालकृष्ण मांडवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणंद (सातारा) : ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ असा गजर करीत निघालेल्या ज्ञानोबारायांच्या पालखीचे पहिले उभे रिंगण रविवारी पार पडले. उभ्या रिंगणाची अपूर्वाई लक्षावधी भाविकांनी अनुभवली.
आषाढ शुद्ध एकादशीचा मुहूर्त साधून २४ जूनला दुपारी श्रींचे निरास्नान. त्यानंतर लोणंदमध्ये रात्रीचा मुक्काम करुन २५ जूनला दुपारी १ वाजता पालखीचे प्रस्थान झाले. लोणंदपासून चार किलोमीटरवरील चांदोबाचा लिंब येथे माऊलींचे अश्व चौखुर उधळीत दिमाखात प्रदक्षिणा पूर्ण करुन पोहोचल्यावर अश्वाच्या पावलांनी पुनित झालेली धूळ माथी लावण्यासाठी भाविकांनी दाटी केली.