मनसेची तंबी : ‘देवा’वर कृपा, राज्यभरात मिळणार २२५ स्क्रीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 04:14 AM2017-12-22T04:14:24+5:302017-12-22T04:15:26+5:30

‘देवा’ या मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर या चित्रपटाला राज्यभरात २२५ स्क्रीन मिळणार आहेत. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये ‘देवा’ चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर गुरुवारी थिएटर मालकांनी ‘देवा’लाही स्क्रीन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारपासून राज्यभरातील २२५ स्क्रीन्सवर ‘देवा’ प्रदर्शित होणार आहे.

 Trouble of MNS: 'God will grace, 225 screens across the state | मनसेची तंबी : ‘देवा’वर कृपा, राज्यभरात मिळणार २२५ स्क्रीन

मनसेची तंबी : ‘देवा’वर कृपा, राज्यभरात मिळणार २२५ स्क्रीन

Next

मुंबई : ‘देवा’ या मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर या चित्रपटाला राज्यभरात २२५ स्क्रीन मिळणार आहेत. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये ‘देवा’ चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर गुरुवारी थिएटर मालकांनी ‘देवा’लाही स्क्रीन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारपासून राज्यभरातील २२५ स्क्रीन्सवर ‘देवा’ प्रदर्शित होणार आहे.
यशराज फिल्म्सचा अभिनेता सलमान खानची भूमिका असलेला ‘टायगर जिंदा है’ हा हिंदी चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. याच दिवशी ‘देवा’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहे. मात्र, ‘देवा’ला प्रदर्शनासाठी स्क्रीन्स उपलब्ध होत नसल्याने वातावरण तापले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने त्यांची बाजू स्पष्ट केली.
‘देवा’देखील धूमधडाक्यात प्रदर्शित करण्याचा ठाम निर्धार केला आहे; परंतु यदाकदाचित तसे झाले नाही, तर यशराज फिल्म्सच्या शूटिंग राज्यात होत असतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन थिएटर्सनीही कायदा हातात घ्यायला लावू नये, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. तर, ‘देवा’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अंकुश चौधरी याने, आम्हाला वाद नकोत; ‘टायगर जिंदा है’ चित्रपटपण चालू दे आणि माझा ‘देवा’पण चालू दे एवढीच इच्छा आहे, अशी भूमिका या एकूणच प्रकरणावर मांडली आहे.
प्राइम टाइमचे काय?
दरम्यान,‘देवा’ चित्रपटाला आता स्क्रीन मिळाल्या असल्या तरी फारच कमी ठिकाणी प्राइम टाइम मिळाला आहे. त्यामुळे आता मनसे प्राइम टाइमचा विषय लावून धरणार की माघार घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता २२५ स्क्रीन्स मिळाल्या असल्या तरी त्यातील बºयाच सिनेमागृहांत प्राइम टाइम मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
चित्रपटगृह, मालकांना संरक्षण हवे-
कोट्यवधी रुपये खर्चून ‘यशराज फिल्म्स’ने ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासाठी देशभरातील चित्रपटगृहे, सिंगल स्क्रीन्स आणि मल्टिप्लेक्स प्राइम टाइम आगाऊ बुकिंग करून ठेवले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट ‘देवा’ला चित्रपटगृह मिळत नाही. हे दोन्ही चित्रपट शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहेत.
कुठल्याही मराठी चित्रपटाला विरोध नाही किंवा कुठल्याही एका हिंदी चित्रपटाला पाठिंबा नाही, परंतु जर मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळाल्या नाही, तर आम्ही सिनेमागृह फोडून टाकू, अशा मनसेच्या दादागिरीला खपवून घेणार नाही. भाजपा सरकारने चित्रपटगृहांना आणि त्यांच्या मालकांना संरक्षण दिले पाहिजे.
मराठी चित्रपटांना व ‘टायगर जिंदा है’लाही संरक्षण दिले पाहिजे आणि मनसेच्या गुंडांना वेळीच रोखा, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस चित्रपट व टीव्ही संघटनेने केली आहे.

Web Title:  Trouble of MNS: 'God will grace, 225 screens across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.