मनसेचा गुढीपाडवा मेळावा अडचणीत
By Admin | Published: April 5, 2016 05:36 PM2016-04-05T17:36:38+5:302016-04-05T20:06:47+5:30
शिवाजी पार्क परिसरात शांतता क्षेत्र असताना पोलिसांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात लाऊड स्पीकरला परवानगी दिल्यानं कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५- शिवाजी पार्क मैदानावर होणारा मनसेचा गुढी पाडवा मेळावा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शिवाजी पार्क परिसरात शांतता क्षेत्र असताना पोलिसांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात लाऊड स्पीकरला परवानगी दिल्यानं कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे.
शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलं असतानाही पोलिसांनी लाऊड स्पीकरला परवानगी दिलीच कशी, असा विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. वेकॉम या संस्थेनं मनसेच्या शिवाजी पार्कातल्या होणा-या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. याविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात धावही घेतली होती.
या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 50 डेसिबल इतकी आवाजाची मर्यादा नेमून दिली असताना पोलिसांनी परवानगी कोणत्या आधारावर दिली, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर यंदापासून दरवर्षी गुढी पाडव्याला शिवाजीपार्कवर मेळाव्याच्या रुपाने सभा घेण्याचा मनसेचा इरादा आहे.