अजून दोन दिवस त्रास सहन करा - मध्य रेल्वे, तीन दिवसांत ३९ एक्स्प्रेस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:02 AM2017-09-01T05:02:58+5:302017-09-01T05:03:35+5:30
मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत
मुंबई : मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाण्याची पातळी जास्त असल्याने या पाण्यामुळे मरेवरील ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाले आहेत, परिणामी रविवारच्या वेळापत्रकानुसार गुरुवारी गाड्या चालविण्यात आल्या असून आणखी दोन दिवस त्रास सहन करा, असे आवाहन मध्य रेल्वतर्फे प्रवाशांना करण्यात आले आहे.
मंगळवारच्या पावसामुळे कुर्ला, सायन, माटुंगा आणि परेल स्थानकातील रेल्वे रुळांवर खुप पाणी साचले होते. सुमारे १२ ते १५ इंचापर्यत पाणी या रुळांवर होते, पाण्यातच लोकल तासनतास उभ्या राहिल्यामुळे मरेच्या ताफ्यातील ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये पाणी गेले आहे. नादुरुस्त लोकल दुरुस्तीचे काम रेल्वेप्रशासन युद्ध पातळीवर करीत आहे. मरेच्या ताफ्यात एकुण १४५ रेक आहेत, त्यापैकी १२२ रेकच्या सहाय्याने रोज सुमारे १६०० फेºया चालवल्या जातात. पावसामुळे १०० रेकच्या मदतीने फेºया होत आहे. शनिवारपर्यंत या सर्व लोकल दुरुस्त करुन त्या सेवेत आणल्या जातील, असे मध्य रेल्वेचे डीआरएम रविंद्र गोयल म्हणाले.
दुरांतो एक्सप्रेसचा अपघात होवून आता अडीच दिवस उलटले तरिही अद्याप रेल्व मार्ग पुर्ववत करण्याचे काम सुरूच आहे. या कामामुळे शुक्रवारी आणि शनिवारी धावणाºया तब्बल २५ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ३१ आॅगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या तीन दिवसातील तब्बल ३९ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी गुरूवारी १४ एक्सपे्रस रद्द करण्यात आल्या असून, १ सप्टेंबरच्या २० आणि २ सप्टेंबरच्या ५ एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.बुधवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी मरेचा डाउन मार्ग वाहतुकीसााठी खुला झाला असला तरी अप मार्गावर चिखल येत असल्यामुळे वाहतुक सुरु करण्यासाठी आणखी वेळ लागणारआहे, असे डीआरएम रविंद्र गोयल यांनी गुरूवारी सांगितले.