तापमानाच्या हेलकाव्याने मुंबईकरांना त्रास
By Admin | Published: February 16, 2015 03:47 AM2015-02-16T03:47:57+5:302015-02-16T03:47:57+5:30
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी अधिक होत असतानाच राज्यात आता कोरडे वारे वाहू लागले आहेत.
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी अधिक होत असतानाच राज्यात आता कोरडे वारे वाहू लागले आहेत. मात्र कोरडया वाऱ्याच्या आगमनानंतरही राज्याच्या किमान तापमानात किंचित घट नोंदविण्यात येत असून, मुंबईतील कमाल आणि किमान तापमान मात्र हेलकावे खात असल्याने मुंबईकरांना या हवाबदलाचा त्रास जाणवू लागला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चोविस तासांत संपुर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय घट झाली असून, विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोवा आणि मराठवाडयाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. सोमवारसह मंगळवारी संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. आणि पुण्यासह मुंबईचे आकाश निरभ्र राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, सातएक दिवसांपूर्वी लक्षद्विपपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत वातावरणात झालेला बदल (वाऱ्यामुळे राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात घट झाली होती. (प्रतिनिधी)