भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, 3 वर्षीय चिमुकली ठार

By Admin | Published: April 2, 2017 03:50 PM2017-04-02T15:50:25+5:302017-04-02T15:50:25+5:30

सिग्नल बंद होण्यापूर्वीच पुढे वेगात निघालेल्या ट्रकचालकाने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार ३ वर्षीय चिमुकीला ट्रकने

The truck flew to the motorcycle, 3-year-old Chimukuli killed | भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, 3 वर्षीय चिमुकली ठार

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, 3 वर्षीय चिमुकली ठार

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 2 - सिग्नल बंद होण्यापूर्वीच पुढे वेगात निघालेल्या ट्रकचालकाने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार ३ वर्षीय चिमुकीला ट्रकने चिरडल्याने ती जागीच ठार झाली.   तिचे वडिलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर आईला किरकोळ मार लागला. हा अपघात रविवारी (दि.२)सकाळी ११ वाजता बीड बायपासरोडवरील संग्रामनगर टी पॉर्इंट वाहतुक सिग्नलवर घडला.
 
अनुष्का अनील पवार(३,रा. छत्रपतीनगर) असे मृत बालिकेचे नाव आहे. तर अनिल पवार आणि कविता अनिल पवारअशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सातारा पोलिसांनी सांगितले की, बीडबायपास परिसरातील छत्रपतीनगर येथील अनिल पाटील यांच्या नातेवाईकाचा विवाह पैठण तालुक्यातील नारायणगाव येथे रविवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी पवार कुटुंब चारचाकी वाहनाने निघाले होते. मात्र प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पवार यांनी त्यांची मोठी मुलगी अमृताला (६)अन्य नातेवाईकांकडे दिले आणि त्यांच्यासोबत लग्नाला येण्याचे तिला सांगितले. लहान मुलगी अनुष्का, पत्नी कविता यांना घेऊन ते सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीने(क्रमांक एमएच-२०डीवाय ०१३४)  नारायणगावला निघाले. बीडबायपास रोडने ते पैठणरोडकडे जात असताना  संग्रामनगर उड्डाणपुल टी पॉर्इंट येथील वाहतुक सिग्नलवर त्यांच्या मागून सुसाट निघालेल्या ट्रकने(डब्ल्यू बी २३-डी ४२५७)त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर समोर बसलेली अनुष्का ट्रकच्या समोरच्या चाकाखाली आल्याने तिच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन ती जागीच ठार झाली. पवार पती-पत्नी ट्रकच्या बाजुला फेकल्या गेल्याने ते बालंबाल बचावले. 

Web Title: The truck flew to the motorcycle, 3-year-old Chimukuli killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.