प्रभू रामचंद्रांची खरी जन्मतारीख 1 जानेवारी?

By Admin | Published: April 4, 2017 11:57 AM2017-04-04T11:57:47+5:302017-04-04T14:11:47+5:30

आज देशभरात रामनवमी जल्लोषात साजरी केली जात आहे. सर्वत्र प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा उत्साह आहे.

True birth date of Lord Ramchandra is January 1? | प्रभू रामचंद्रांची खरी जन्मतारीख 1 जानेवारी?

प्रभू रामचंद्रांची खरी जन्मतारीख 1 जानेवारी?

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 -  आज देशभरात रामनवमी जल्लोषात साजरी केली जात आहे. सर्वत्र प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा उत्साह आहे. अर्थात हा जन्मोत्सव तिथीनुसार साजरा केला जातो. मात्र, खरंच तुम्हाआम्हाला प्रभू रामचंद्रांचा खरा जन्मदिन कधी असतो, याची माहिती आहे का? 
 
याचं उत्तर कल्याण येथे राहणारे निवृत्त अभियंता प्रफुल्ल वामन मेंडकी यांनी शोधलं आहे. संशोधन अभ्यास करपन त्यांनी प्रभू रामचंद्रांची जन्मतारीख 1 जानेवारी इसवी सन पूर्व 5648  असल्याचा दावा केला आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे येथील पुष्पक प्रकाशन संस्थेने प्रफुल्ल मेंडकी यांचे हे संशोधन ‘रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ या नावाने प्रसिद्ध केले आहे. 
(देशभरात गोमांस बंदी करा, सुफी मौलवींची पंतप्रधान मोदींकडे मागणी)
 
प्रफुल्ल मेंडकी यांनी संपूर्ण रामायणात निरनिराळ्या प्रसंगी वर्णन केलेली ग्रह-नक्षत्रांची स्थिती, पौर्णिमा-अमावास्यांचा उल्लेख, चंद्र-सूर्य ग्रहणांचे संदर्भ, चांद्रमासात होणारा बदल लक्षात घेऊन, संगणकाचा आणि आधुनिक गणिताचा वापर करून रामायणकालाचे संशोधन करण्याचा प्रयत्न केला. संशोधनादरम्यान, त्यांनी नासा संस्थेतील शास्त्रज्ञांचीही मदत घेतली.
 
रामायणाच्या कालात ऋतूंच्या प्रारंभीचे चांद्रमहिने निराळे होते. कारण चंद्र पृथ्वीपासून हळूहळू दूर जात आहे आणि पृथ्वीच्या परिवलनाची गतीही मंदावत आहे. या सर्व गोष्टींचा विचार  संशोधन करताना केला, प्रफुल्ल मेंडकी यांनी सांगितले.

 

Web Title: True birth date of Lord Ramchandra is January 1?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.