ट्रम्प हे तर, भारतासाठी इष्टापत्ती - मुकेश अंबानी

By admin | Published: February 16, 2017 11:53 AM2017-02-16T11:53:35+5:302017-02-16T12:12:26+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योगविषयक धोरणांमुळे जगातील अनेक देश चिंतित आहेत. आयटी उद्योगात काम करणा-या अनेक भारतीयांना आपल्या भवितव्याची चिंता सतावत आहे.

Trump for India, Ichtapati - Mukesh Ambani | ट्रम्प हे तर, भारतासाठी इष्टापत्ती - मुकेश अंबानी

ट्रम्प हे तर, भारतासाठी इष्टापत्ती - मुकेश अंबानी

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योगविषयक धोरणांमुळे जगातील अनेक देश चिंतित आहेत. आयटी उद्योगात काम करणा-या अनेक भारतीयांना आपल्या भवितव्याची चिंता सतावत आहे. पण रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे मात्र बिलकुल याउलट मत आहे.  ते ट्रम्प यांच्या धोरणांकडे एक संधी म्हणून पाहत आहेत. 
 
आपण भारताला जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर बाजारपेठ बनवू शकतो. त्यासाठीचे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध आहे. ट्रम्प यांच्या उपायांमुळे भारतीय प्रतिभेला आणि आयटी उद्योगाला भारतातील समस्या सोडवण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल. देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी आहे. यामुळे लोकांचे जीवनमान उंचावण्याची एक संधी मिळेल तसेच इंडस्ट्रीची उत्पादकता वाढवण्यावरही लक्ष दिले पाहिजे असे मुकेश अंबानी म्हणाले. 
 
नॅसकॉम इंडियाच्या लीडरशीप फोरमच्या मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डिजीटल इको सिस्टीम उभारणे कोणत्याही एका कंपनीला शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कंपन्यांना पुढच्या जनरेशनचे तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट धोरण अवलंबताना एच 1 बी विसावर मर्यादा आणली आहे. याचा फटका आयटी उद्योगात काम करणा-या भारतीयांना बसत आहे. 
 

Web Title: Trump for India, Ichtapati - Mukesh Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.