काँग्रेस सप्टेंबरमध्येच फुंकणार निवडणूक प्रचाराचे रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 05:09 AM2018-07-15T05:09:11+5:302018-07-15T05:09:22+5:30
सत्ताधारी सेना-भाजपाचा मागील चार वर्षांचा कारभार कमालीचा निराशाजनक राहिला आहे.
- विशाल सोनटक्के
नांदेड : सत्ताधारी सेना-भाजपाचा मागील चार वर्षांचा कारभार कमालीचा निराशाजनक राहिला आहे. सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत येत्या सप्टेंबरमध्येच काँग्रेस राज्यव्यापी यात्रेच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत जाणाऱ्या या यात्रेमध्ये काँग्रेसचे दिग्गज पदाधिकारी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी खास ‘लोकमत’ शी संवाद साधला. विद्यमान सरकारच्या कारभाराला महाराष्टÑातील जनता कंटाळली आहे. शेतकरी, व्यापारी, कर्मचाºयांबरोबरच राज्यातील सर्व घटकांत सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना असल्याने येणाºया निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेसकडून तयारी सुरु आहे. २३ जिल्ह्यांत प्रदेश काँग्रेसच्या वतीने शिबिरे घेण्यात आली आहेत. राज्यभरात बुथ कमिट्यांचेही काम सुरु आहे. गावागावांतील हे बुथ एकमेकांना जोडण्यात येत आहेत. नुकताच पक्षाच्या वतीने ‘शक्ती अॅप’चा प्रारंभ करण्यात आला. या अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता थेट काँग्रेसच्या राष्टÑीय कमिटीशी जोडला जाईल तसेच आवश्यकता पडल्यास कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेता येतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा प्रयोग काँग्रेस महाराष्टÑासह देशभरात राबविणार आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.
>सेना-भाजपा, एमआयएम नाण्याच्या दोन बाजू
शिवसेना-भाजपा आणि एमआयएम या पक्षांची वाटचाल एकाच दिशेने सुरू आहे. हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका करीत जातीयवाद, धर्मांधतेला खतपाणी घालणाºया एमआयएमसोबत समझोता करणे घातक ठरेल. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकरांनी त्या मार्गाने जावू नये.
- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस