तृप्ती देसाईंनी हाजी अली दर्ग्यात केला प्रवेश, मजार प्रवेश नाही

By Admin | Published: May 12, 2016 07:02 AM2016-05-12T07:02:24+5:302016-05-12T09:05:17+5:30

तृप्ती देसाई यांनी कडक सुरक्षेसह आज सकाळी ६ च्या सुमारास कडेकोट सुरेक्षेसह हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले आहे मात्र त्यांना मजारमध्ये प्रवेश नाकारला गेला

Trupti Desai did not have access to the Haji Ali Durbar, the entrance to Mazar was not accessible | तृप्ती देसाईंनी हाजी अली दर्ग्यात केला प्रवेश, मजार प्रवेश नाही

तृप्ती देसाईंनी हाजी अली दर्ग्यात केला प्रवेश, मजार प्रवेश नाही

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 12 - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी सकाळी हाजी अली दर्ग्यात प्रवेश करुन दर्शन घेतले. मात्र त्यांना मजारमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. पोलिसांनी यावेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. याअगोदरही तृप्ती देसाई यांनी 28 एप्रिलला हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना रोखण्यात आलं होतं. 
 
महिलांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती देसाईंनी लढा सुरु केला आहे. शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केले ज्यानंतर महिलांना प्रवेश दिला जाऊ लागला. पुरुषांसोबत महिलांनाही दर्शनाचा हक्क मिळावा यासाठी मंदिरांमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर तृप्ती देसाईंनी आपला मोर्चा हाजी अली दर्ग्याकडे वळवला होता. 
 
तृप्ती देसाई यांनी गुरुवारी सकाळी हाजी अली दर्ग्यात जरी प्रवेश केला असला तरी महिलांना परवानगी आहे तिथपर्यंतच त्यांना जाऊ दिले गेले. त्यांना मजारमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. मात्र यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख सुरक्षाबंदोबस्त तैनात केला होता. 'पोलिसांनी आम्हाला यावेळी योग्य मदत केली आहे. समान हक्कांसाठीचा हा लढा आहे. पुढील वेळी आम्ही मजारमध्ये जाण्याचा प्रयत्न करु', असं तृप्ती देसाई म्हणाल्या. तसंच 15 दिवसात विश्वस्तांनी महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
 
एमआयएम, समाजवादी पार्टीसह मुस्लीम नेते आणि संघटनांनी दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशावर जोरदार आक्षेप घेत घेतला आहे. 28 एप्रिलला देसाई यांनी समर्थकांसह दर्ग्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखून धरले. प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडून त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यांनी समर्थकांसह दर्गा प्रवेशाचा हट्ट धरला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. अखेर दर्ग्याच्या बाहेरील फुटपाथावर उभे राहून देसाई यांनी दर्ग्याला नमस्कार केला.
 

Web Title: Trupti Desai did not have access to the Haji Ali Durbar, the entrance to Mazar was not accessible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.