तृप्ती देसाई यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:39 AM2017-07-18T01:39:32+5:302017-07-18T01:39:32+5:30
सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करून तसेच जातीवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांसह इतर ४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करून तसेच जातीवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांसह इतर ४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. के. पाटील यांनी सोमवारी फेटाळला. तृप्ती देसाई यांसह इतर चार जणांनी मकासरे यांना मारहाण करून त्यांच्याकडील २ मोबाइल, सोन्याची चेन व २ हजार रुपये असा एकूण २७ हजारांचा ऐवज लुटला. तसेच, जातीय शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय अण्णा मकासरे (वय ३३, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. २७ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम समोरील महामार्गावर ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.