तृप्ती देसार्इंनी गाभाऱ्यात जाऊन त्र्यंबकेश्वराचे केले पूजन
By admin | Published: April 23, 2016 03:51 AM2016-04-23T03:51:58+5:302016-04-23T03:51:58+5:30
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळवण्यावरून निर्माण झालेला वाद संपुष्टात आल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी सहकाऱ्यांसह गाभाऱ्यात जाऊन
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळवण्यावरून निर्माण झालेला वाद संपुष्टात आल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी सहकाऱ्यांसह गाभाऱ्यात जाऊन भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी माथा टेकला. यावेळी त्यांनी विधिवत पूजाही केली.
स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांनी गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले होते. त्यांनतर दर्शनाची मागणी सर्वप्रथम करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा केली. अनुचित घटना घडू नये म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील चौकात चोख पोलीस बंदोबस्त होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश खुला झाल्याने येथील संघर्ष संपला असल्याचे सांगितले.
मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा
यासाठी येत्या २८ एप्रिल रोजी विश्वस्तांशी चर्चा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)