कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न संतापजनक- अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:50 AM2018-07-24T01:50:34+5:302018-07-24T01:51:06+5:30
वारकऱ्यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंना गुरू मानणाऱ्यांना सुचू शकतो; चव्हाणांचा टोला
मुंबई : लाखोंचे मोर्चे कोणतीही अनुचित घटना न घडू देता शांततामय मार्गाने काढणाºया मराठा समाजातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत, हे संतापजनक असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे या तरूणाचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आणि दु:खद आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठा आंदोलकांनी संयम राखावा आणि शांततपूर्ण आंदोलनाचा मार्ग सोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. वारकºयांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंना गुरू मानणाºयांच्या डोक्यात येऊ शकतो. सरकारचा विरोध करणारे हे प्रत्येकवेळी गुन्हेगार ठरवले जात आहेत. मोर्चा काढला त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला.
एल्गार परिषदेच्या आयोजकांना माओवादी ठरवण्याचा प्रयत्न सरकारने केला. भीमा कोरेगाव दंगलीच्या खºया सूत्रधारांना सोडून आंदोलन करणाºया दलित बांधवांची माता भगिनींसह धरपकड करण्यात आली त्याच धर्तीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुंतवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.