‘त्या’ नक्षल्यांची ‘मुंबई लिंक’ शोधण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 02:33 AM2018-01-15T02:33:42+5:302018-01-15T02:34:26+5:30
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या सात संशयित नक्षलवाद्यांची ३ जानेवारीला मुंंबईसह राज्यात झालेल्या दंगलीमध्ये बजाविलेली भूमिका आणि स्थानिक कार्यकर्त्यांना
मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या सात संशयित नक्षलवाद्यांची ३ जानेवारीला मुंंबईसह राज्यात झालेल्या दंगलीमध्ये बजाविलेली भूमिका आणि स्थानिक कार्यकर्त्यांना केलेल्या सहकार्याबाबतची माहिती घेतली जात आहे. त्यांच्याकडे जप्त केलेल्या साहित्यातून स्थानिक संदर्भाचे ‘कनेक्शन’ शोधण्यात येत असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित असलेल्या सात तरुणांना शुक्रवारी एटीएएसच्या पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. हे सर्वजण तेलंगणच्या करीमनगर व नालगोंडा येथील असून गेल्या काही दिवसांपासून ते मुंबई उपनगर व डोंबिवलीत वास्तव्यास होते. त्यांना याठिकाणी सहकार्य करणाºयांचा शोध घेण्यात येत आहे. सातजणांचा कोरेगाव-भीमा येथील हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यभरात उद्भविलेल्या हिंसाचारामागे सहभाग असल्याचे सांगितले जाते.