विमानात कन्हैयाचा गळा दाबण्याचा प्रयत्न
By admin | Published: April 24, 2016 10:59 AM2016-04-24T10:59:54+5:302016-04-24T16:24:00+5:30
मुंबईहून पुण्याला विमानाने जाण्यासाठी निघालेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारवर जेट विमानात हल्ल्याचा प्रयत्न झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - मुंबईहून पुण्याला विमानाने जाण्यासाठी निघालेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारवर रविवारी जेट विमानात हल्ल्याचा प्रयत्न झाला.
मुंबई विमातळावर ही घटना घडली. एका व्यक्तीने विमानात कन्हैयाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी मानस डेकाला अटक केली आहे. कन्हैयाने त्याच्या टि्वटर अकाऊंटवरुन या हल्ल्याची माहिती दिली.
पुण्याच्या गंधर्व हॉलमध्ये आज दुपारी चार वाजता कन्हैयाची सभा आहे. त्यासाठी कन्हैया विमानाने पुण्याला जात होता. कन्हैयाने आरोप केल्यानंतर दोघांना मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कन्हैयाची तक्रार नोंदवून घेतली व मानसला अटक केली.
मानस डेकाने कन्हैयाचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी कन्हैयाचा गळा आवळला नाही. तो पब्लिसिटी स्टंट करत आहे असा आरोप त्याने केला. मानस सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. मी कोलकाताहून मुंबईमार्गे पुण्याला जात होतो असे त्याने सांगितले.
कन्हैयावर हल्ल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. नागपूरमध्येही त्याला रोखण्याचा प्रयत्न झाला होता.
शनिवारी चेंबूर टिळकनगरमधील आदर्श महाविद्यालयात त्याची सभा झाली. आपल्या सभांमधून कन्हैया मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहे. ‘स्वच्छ भारत’ वा ‘मेक इन इंडिया’सारख्या योजना भूलथापा असून, हे मोदींचे ‘फेक इन इंडिया’ आहे, अशा शब्दांत त्याने टीका केली होती.
कन्हैया कुमारने मुंबई विमानातळावर नोंदवलेला एफ आय आर.
Yet again, this time inside the aircraft, a man tries to strangulate me.
— Kanhaiya Kumar (@kanhaiyajnusu) April 24, 2016