सरकारी जमीन लुबाडण्याचा प्रयत्न

By admin | Published: October 8, 2016 02:03 AM2016-10-08T02:03:05+5:302016-10-08T02:03:05+5:30

सरकारी जमिनींवर बेकायदा भराव आणि बेकायदेशीर बांधकाम करण्याचे प्रकार खासगी विकासकांनी सुरू केले आहेत.

Trying to loot the government land | सरकारी जमीन लुबाडण्याचा प्रयत्न

सरकारी जमीन लुबाडण्याचा प्रयत्न

Next


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सरकारी जमिनींवर बेकायदा भराव आणि बेकायदेशीर बांधकाम करण्याचे प्रकार खासगी विकासकांनी सुरू केले आहेत. सरकारी जमीन लुबाडून कोट्यवधी रु पयांची माया जमविण्याचा असाच एक धक्कादायक प्रकार अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कारवाईचे आदेश दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने याचा पंचनामा केला आहे. त्याबाबतचा अहवाल अलिबागच्या तहसीलदारांना शुक्रवारी सुपूर्द केला, मात्र अहवालामध्ये काय नमूद केले आहे याचा खुलासा होऊ शकला नाही.
पोयनाड बाजारपेठेलगत असलेल्या स्मशानभूमीच्या सरकारी जागेवर सर्व्हे नंबर ६ मध्ये खासगी विकासकाने बेकायदा बांधकाम सुरु केल्याची तक्र ार आंबेपूरचे ग्रामस्थ प्रवीण म्हात्रे यांनी सप्टेंबर २०१६ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. बेकायदा बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करु न ते बांधकाम बंद करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांना २८ सप्टेंबर २०१६ रोजी दिले होते. हे बांधकाम वाणिज्य दुकान गाळ्याच्या स्वरूपाचे असल्याचे प्रवीण म्हात्रे यांनी तक्र ारीत नमूद केले होते.
सरकारी जागा हडप करुन कोट्यवधी रुपयांचा नफा कमाविण्याचा घाट खासगी विकासकाने घातला आहे, अशी तक्र ार केली होती. तेव्हा बांधकाम युध्दपातळीवर सुरु असल्याने आजच्या घडीला पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रशासन कारवाईला उशीर लावेल तेवढा फायदा संबंधितांचा होणार आहे, असे प्रवीण म्हात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
>या तक्र ारीच्या अनुषंगाने पंचनामा करण्यात आला आहे. त्याचा अहवाल अलिबागच्या तहसीलदारांना शुक्र वारी सायंकाळपर्यंत देण्यात येणार आहे.
- एच.आर. कांबळे,
मंडळ अधिकारी

Web Title: Trying to loot the government land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.