सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न
By admin | Published: October 3, 2014 02:21 AM2014-10-03T02:21:39+5:302014-10-03T02:21:39+5:30
बारामतीजवळील ढेकळवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकत्र्यानी केला.
Next
>बारामती (जि़ पुणो) : बारामतीजवळील ढेकळवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांची सभा उधळण्याचा प्रयत्न धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकत्र्यानी केला.
सुनेत्र पवार यांची चौक सभा सुरू असताना अचानक कार्यकत्र्यानी घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्याशी कार्यकत्र्यानी चर्चेचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर घोषणाबाजीच्या गदारोळातच उपस्थित महिलांशी संवाद साधून सभा आटोपती घ्यावी लागली.
ढेकळवाडीतील मारूती मंदिराच्या पटांगणात आयोजित कॉर्नर सभेस सुमारे 15क् ग्रामस्थ उपस्थित होते. सभा सुरू होणार तोच त्या ठिकाणी उपस्थित कार्यकत्र्यानी घोषणाबाजीला सुरूवात केली. सुनेत्र पवार यांनी या कार्यकत्र्याशी चर्चा केली. पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. त्यानंतर काही काळ कार्यकर्ते शांत राहिले. पुन्हा ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा तरूण कार्यकर्ते देत होते. त्यावेळी राष्ट्रवादीतील धनगर समाजाच्या पदाधिका:यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणांनी त्यांना निरूत्तर केले. ‘तुम्हाला समाजाची काही देणो घेणो नाही, आम्ही समाजाच्या हक्कासाठी लढत आहोत. तुम्ही पदाला चिटकून बसला आहे’ असे प्रत्त्युत्तर दिले. त्यानंतर चर्चा करू, असा प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी ऐकले नाही. (वार्ताहर)
तणावाचे वातावरण
घोषणाबाजीमुळे बहुतेक ग्रामस्थ सभास्थळावरून निघून गेले. त्यानंतर महिला आणि इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत थोडक्यात सभा पार पडली. त्या दरम्यान देखील कार्यकत्र्याची घोषणाबाजी सुरूच होती. अखेर तेथील सभा आटपून सुनेत्र पवार यांच्यासह सर्व कार्यकर्ते पिंपळी येथील सभेला निघून गेले. कार्यकत्र्याच्या या भूमिकेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.