गीतेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

By admin | Published: July 8, 2014 01:23 AM2014-07-08T01:23:16+5:302014-07-08T01:23:16+5:30

राजकारणात राजी- नाराजीचा खेळ सुरू असतो हे खरे असले, तरी ठाकरी घराण्याचा बाजच मुळी वेगळा.

Trying to remove the annoyance of songs | गीतेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

गीतेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Next
संजय पाठक - नाशिक
राजकारणात राजी- नाराजीचा खेळ सुरू असतो हे खरे असले, तरी ठाकरी घराण्याचा बाजच मुळी वेगळा. नाराज असेल तर राजी करण्याच्या भानगडीत न पडता खुशाल जा असे सांगणा:या ठाकरी शैलीला बाजूला दूर सारून ज्या पद्धतीने राज यांनी पक्षाचे एक शिलेदार आमदार वसंत गिते यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले, ते बघता राज यांची हतबलता आणि त्यामागूनच आलेली अपरिहार्यता अधोरेखित झाली आहे.
    मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले. साहजिकच शिवसेनेला मानणा:या अनेकांना तर राज यांच्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे  प्रतिबिंब दिसत असते. सेनाप्रमुखांची लकब, हजरजबाबीपणा, मिश्कीलपणा असे अनेक गुण राज यांच्यात आहेत. शिवसेनाप्रमुख म्हणून काम करताना बाळासाहेब ठाकरे यांची संघटना हाताळण्याची एक वेगळीच शैली होती. संघटनेतून बाहेर पडण्याचे धाडस कोणी करत नव्हते आणि 
केले तर शिवसेनास्टाईल धडा शिकवला जाईल या भीतीने पक्षांतर करणारा काही दिवस तरी दडी मारून बसत असे. शिवसेनेची दहशत असतानाचे खोपडे प्रकरण असो अथवा छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यावर झालेले हल्ला प्रकरण असो, अन्य पक्षांपेक्षा ही वेगळीच धाटणी राहिली आहे. कालांतराने हा आक्रमकपणा कमी झाला असला, तरी शिवसेनाप्रमुखांनी पक्ष सोडणा:यांना रोखले मात्र नाही. गेले तर खुशाल जा, असे बजावताना जेथे जाल तेथे तरी प्रामाणिक राहा असे ते आयाराम गयारामांना सांगत. अनेक माजी मंत्र्यांचाही त्यात समावेश होता. परंतु ठाकरे घराण्याचा हाच शिरस्ता अचानक मोडीत निघाला की काय, असा प्रश्न नाशिकमधील आमदार गिते प्रकरणातून निर्माण झाला आहे.
मनसे स्थापन झाल्यापासून राज ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार असलेले वसंत गिते हे नाशिक नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात सर्र्वेसर्वा आहेत. गिते यांनी दिलेला शब्द हाच मनसेत प्रमाण मानला जात होता. असे असताना, गेल्या काही महिन्यांपासून आणि विशेषत: लोकसभा निवडणुकीत गिते यांच्या नेतृत्वाकडे राज यांनी संशयाने पाहिले आणि नंतर घेतले गेलेले निर्णय गिते यांच्या पचनी पडले नाहीत. त्यानंतर गिते यांच्या भाजपा आणि शिवसेनेतील पक्षांतराविषयी चर्चा सुरू झाल्या आणि राज ठाकरे थेट नाशिक सुभ्यावर दाखल झाले. खुद्द राज यांनी गिते यांची नाराजी दूर करण्यासाठी व्यक्तिगत चर्चा केली. त्यातून राज या विषयावर किती गंभीर आहेत, हेच दिसून आले.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाचे पानिपत बघता आणि महायुतीची हवा दिसू लागताच गिते यांनी दिशाबदलाची तयारी केली असेल तर तीही राजकारणाचा एक भाग आहे. म्हणून राज ठाकरे यांनी इतकी अगतिकता दाखवावी, हे काहीसे अनकालनीय आहेच; शिवाय वदलत्या वा:यामुळेच ठाकरे यांची कार्यशैली तर बदलली नाही ना?
 
च्एक नव्हे, दोन नव्हे, तीन तीन आमदार, नाराज वसंत गिते यांची मनधरणी करण्यासाठी थेट राजसाहेबांच्या आदेशावरुन वसंत गितेंच्या निवासस्थानी धावत गेले. त्यांना पुढे घालून सरकारी  विश्रमगृहावर घेऊन आले. बंद दरवाजाआड गुप्त चर्चा झाली. ती सुरु असतानाच खोलीचा दरवाजा उघडून राजसाहेब ताडकन बाहेर पडले. कोणाशीही चकार शब्द न बोलता, गाडीत बसून मुंबईकडे रवानाही झाले. 
च्वसंत गितेंभोवती साहजिकच गराडा पडला.  ‘आपण नाराज नाही’, असे त्यांनी 
सांगूनही टाकले, पण त्यांचे शब्द आणि त्यांची देहबोली यांच्यात कुठेही मेळ मात्र दिसत नव्हता. जेमतेम पंधरा-वीस मिनिटांच्या या नाटय़ाने मनसेत ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याची प्रचिती येऊन गेली. पुढील चर्चेसाठी म्हणो गिते यांना  उद्याच मुंबईत पाचारण केले गेले आहे. 

 

Web Title: Trying to remove the annoyance of songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.