पाठ्यपुस्तकांद्वारे चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न
By admin | Published: August 29, 2016 06:32 AM2016-08-29T06:32:37+5:302016-08-29T06:32:37+5:30
सध्या पाठ्यपुस्तकांच्या आडून ऐतिहासिक तथ्य लपवून चुकीचा संदेश समाजात पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतिहासासोबत होणारी छेडछाड थांबली पाहिजे
धुळे : सध्या पाठ्यपुस्तकांच्या आडून ऐतिहासिक तथ्य लपवून चुकीचा संदेश समाजात पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतिहासासोबत होणारी छेडछाड थांबली पाहिजे, असा सूर बामसेफच्या वतीने आयोजित चर्चासत्रात उमटला.
हिरे भवन येथे रविवारी बामसेफच्या दोन दिवसीय २९ व्या राज्य अधिवेशनाचा समारोप झाला. दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर चर्चासत्रे झाली. ‘पाठ्यपुस्तकाच्या आडून ऐतिहासिक तथ्यांना लपवून चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न’ या विषयावर खुली चर्चा झाली.
मध्यकालीन आधुनिक भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक तथ्यांसोबत मोठ्या प्रमाणात छेडछाड करण्यात आली आहे. केंद्र व राज्यस्तरावरील शाळा व महाविद्यालयीन स्तरावरील पाठ्यपुस्तकांच्या आडून अनेक ऐतिहासिक तथ्य लपवून, त्या जागी चुकीची माहिती पसरविली जात आहे. राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या अभ्यास व लेखन समितीने अनेक ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केली आहे. बौद्ध साहित्य व जीवनकाळाला दुय्यम स्थान दिले आहे. इतिहासासोबत होणारी छेडछाड थांबविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही मत व्यक्त करण्यात आले. अध्यक्षस्थानी संजय इंगोले होते. चर्चेत राहुल वाघ, कोल्हापूरचे प्रा. श्रीकृष्ण महाजन सहभागी झाले.