वरलीचे आकडे काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न!

By admin | Published: January 31, 2017 02:38 AM2017-01-31T02:38:06+5:302017-01-31T02:38:06+5:30

बालकाच्या समयसूचकतेने वाचले प्राण: नरबळी, काळीजादू कायद्याअंतर्गत मांत्रिकासह दोघांना अटक.

Trying to solve the above figures! | वरलीचे आकडे काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न!

वरलीचे आकडे काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न!

Next

शेगाव, दि. ३0- वरलीचे आकडे काढण्यासाठी एका १४ वर्षीय पायाळू बालकाचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार येथे रविवारी घडला. सदर बालकाने समयसूचकता दाखवून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. याप्रकरणी पोलिसांनी एका मांत्रिकासह दोघांना अटक केली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोघांना एक फ्रेब्रुवारीपर्यंंंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
खामगाव रोडवरील गजानन वाटीका येथे सुरु असलेल्या पारायणातील महाप्रसाद घेऊन एक १४ वर्षीय मुलगा बाहेर आला. यावेळी व्यंकटेशनगरात राहणार्‍या गणेश प्रल्हाद ताले (२९) याने त्याला घरी सोडतो असे सांगून आपल्या मोटारसायकलवर बसवून एमएसईबी चौकातील एका पानटपरीच्या मागे नेले. तेथे शंकर जगदेव शेगोकार उर्फ महाराज (६५ रा. तिनपुतळा शेगाव) हा आधीच हजर होता. तेथे दोघांनी बालकाच्या अंगावर कपडा टाकून त्याच्यासमोर कापूर जाळला. मंत्रोच्चार करीत त्याच्या हातात उलटी कपबशी देऊन त्यास आकडे म्हणावयास लावले. सदर मुलाने आकडे बरोबर सांगितल्यानंतर हा मुलगा आपल्या ह्यकामाचाह्ण आहे असे एकमेकांशी बोलले. यानंतर महाराज व तालेने सदर बालकावर अघोरी कृत्य सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्यासोबत काहीतरी गडबड होत असल्याचे लक्षात येताच बालकाने समयसूचकता दाखवून तेथून पळ काढला.
घरी परतल्यानंतर त्याने या घटनेची माहिती वडीलांना दिली. याबाबत बालकाच्या पित्याने रविवारी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरूध्द महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि आणि अघोरी कृत्य प्रतिबंधात्मक तसेच काळीजादू अधीनियम २0१३ कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला व मांत्रिकासह दोघांना रात्री उशिरा अटक केली. पोलिसांनी मांत्रिकाने जादुटोण्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे.

Web Title: Trying to solve the above figures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.