गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्ही राजकारणातले ग्रँड मास्टर; शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:27 AM2023-08-16T11:27:00+5:302023-08-16T11:27:37+5:30

ठाण्यात पद्म विभूषण बुद्धिबळ पट्टू विश्वनाथन आनंद येत आहेत. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यात समाजकारणातील ग्रॅंड मास्टर आनंद दिघे आहे, असे शिंदे म्हणाले. 

Trying to checkmate me over the years, but we're grand masters in politics; Eknath Shinde welcomed Vishvnathan Anand | गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्ही राजकारणातले ग्रँड मास्टर; शिंदेंचा टोला

गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्ही राजकारणातले ग्रँड मास्टर; शिंदेंचा टोला

googlenewsNext

उद्धव ठाकरेंची सत्ता उलथवून लावताना सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीतील बुद्धीबळ खेळतानाचा फोटो व्हायरल झाला होता. गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाही. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रॅंड मास्टर बोललात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे. 

राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्या सारख्या विरोधकांना बुद्धिबळ खेळणे गरजेचे आहे. काही विरोधक तिरकी चाल चालवतात, काही अडीच घरे चालणारे घोडे राजकारणात आहेत. जनता सोबत असल्याने विरोधकांच नेहमी चितपट होत आहेत. राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्या सारख्या विरोधकांना बुद्धीबळ खेळणे फार गरजेचे आहे, असे शिंदे म्हणाले. 

ठाण्यात पद्म विभूषण बुद्धिबळ पट्टू विश्वनाथन आनंद येत आहेत. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यात समाजकारणातील ग्रॅंड मास्टर आनंद दिघे आहे, असे शिंदे म्हणाले. 

महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य  आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील, हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबद्ध होऊया आणि प्रयत्नशील राहू या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यदिनी केले.

Web Title: Trying to checkmate me over the years, but we're grand masters in politics; Eknath Shinde welcomed Vishvnathan Anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.