'तिरुपती देवस्थानचा आदर, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:52 PM2022-07-29T18:52:07+5:302022-07-29T18:59:20+5:30

'तिरुपती देवस्थानाला विनंती आहे की, महाराजांचे फोटो-मूर्ती काढणे थांबवा नाहीतर महाराष्ट्रातील तरुणांच्या रागाला सामोर जावं लागेल.'

Ttirupati Balaji Temple and Chhatrpati Shivaji Maharaj controversy ; 'Tirupati temple is respected, but Chhatrapati Shivaji Maharaj is a god for us', says MNS leader Avinash Jadhav | 'तिरुपती देवस्थानचा आदर, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत'

'तिरुपती देवस्थानचा आदर, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत'

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान चर्चेत आले आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला असता, त्याच्या गाडीमध्ये लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर/मूर्ती काढायला लावली. त्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर महाराष्ट्रातील लोकांकडून तिरुपती देवस्थानाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

'महाराज आमच्यासाठी देवाच्या स्थानी'
फेसबूकवर व्हिडिओद्वारे जाधव म्हणाले की, 'मागील काही दिवसांपासून एक प्रकार घडतोय. आपल्या महाराष्ट्रातली अनेक लोक खासगी गाडीने तिरुपतीला जातात. यातील बहुतेक गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती लावलेली असते. आपण महाराजांना देवाच्या स्थानी पाहतो, अनेकजण गणपतीऐवजी महाराजांची मूर्ती लावतात. पण, गेल्या काही दिवसांपासून तिरुपती देवस्थानाला गेल्यानंतर तिथे महाराजांची मूर्ती काढली जात आहे. यामागे नेमकी काय मानसिकता आहे, हे माहित नाही.'

'...तर वाद होणार'
'माझी तिरुपती बालाजीवर प्रचंड श्रद्धा आहे. मी वर्षातून 5-6 वेळा तिरुपतीला जातो. तिथे तिथले लोक त्यांच्या भाषेत बोलतात, त्यांना त्यांच्या भाषेवर अभिमान आहे. ते मान्य केलं, पण महाराजांची मूर्ती काढणे, फोटो काढणे, यात कोणती मर्दानगी आहे. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, तिथल्या प्रशानाला याबद्दल बोललं पाहिजे. कारण, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सतत होत राहिलं, तर वाद होत राहणार. त्यामुळे तिथल्या प्रशासनाला बोलून मार्ग काढावा,' असं जाधव म्हणाले.

'तुमच्याही गाड्या महाराष्ट्रात येतील'
'कुठलाही वाद होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. तिरुपती बालाजीला जेवढं मानतात, तेवढंच महाराजांनाही मानणारी लोक आहे. त्यामुळे दोन देवांमध्ये वाद होऊ नये. आमची श्रद्धा आमच्याकडे राहू द्या, आम्ही आमच्या गाड्यांवर महाराजांचे स्टिकर आणि मूर्ती लावत आहोत. तुमच्या गाड्यांमध्ये महराजांचे स्टिकर लावत नाहीयेत. अशा घटना पुढे होऊ नये, नाहीतर महाराष्ट्रातला तरुण शांत बसणार नाही. उद्या तुमच्याही गाड्या महाराष्ट्रात येती,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

Web Title: Ttirupati Balaji Temple and Chhatrpati Shivaji Maharaj controversy ; 'Tirupati temple is respected, but Chhatrapati Shivaji Maharaj is a god for us', says MNS leader Avinash Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.