भेंडवळची घटमांडणी मंगळवारी !
By admin | Published: April 20, 2015 02:04 AM2015-04-20T02:04:23+5:302015-04-20T02:04:23+5:30
३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी सायंकाळी पुंजाजी महाराज
जयदेव वानखडे, जळगाव जामोद (जि. बुलडाणा)
३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी सायंकाळी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. घटातील रात्रभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून २२ एप्रिल रोजी सूर्योदयासमयी यंदाच्या हंगामाविषयी भाकीत वर्तविले जाईल.
वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या घटमांडणीची सुरूवात केली. ती परंपरा सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या भेंडवळच्या वाघ कुटुंबीयांनी आधुनिक युगातही जपली आहे. या विधीसाठी आवश्यक नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज व स्व. रामदास महाराज वाघ यांचे पुत्र पुंजाजी महाराज २१ एप्रिल रोजी सायंकाळी गावाच्या पुर्वेस बसस्टॅण्ड लगतच्या शेतात सूर्यास्ताचे वेळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटाची मांडणी करणार आहेत. शेतात गोलाकार घट तयार करून त्यामध्ये खरीप व रब्बी हंगामात येणारी १८ प्रकारची धान्ये गोलाकार पद्धतीने मांडली जातात. पृथ्वीचे प्रतीकात्मक स्वरूपातील पुरी, समुद्राचे प्रतीक घागर त्यावर असलेले पापड, भजा, वडा, पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीकात्मक मातीची ढेकळे, पानसुपारी ही सर्व प्रतीकात्मक खाद्य वस्तू व धान्याची मांडणी होईल.